महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:40 IST2017-10-07T00:40:26+5:302017-10-07T00:40:26+5:30

महापौर निवडणुकीत भाजप स्वतंत्र उमेदवार न देता युतीतच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 There is no BJP candidate for the post of Mayor | महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार नाही

महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेने गुरुवारी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करताच महापालिकेत राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. सेनेसोबत असलेली युती तोडून भाजपतर्फे स्वतंत्र उमेदवार देण्याची भाषा मागील काही दिवसांपासून स्थानिक नेत्यांकडून सुरू होती; मात्र महापौर निवडणुकीत भाजप स्वतंत्र उमेदवार न देता युतीतच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युती धर्मानुसार भाजप उपमहापौरपदावर समाधान मानणार आहे.
महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा पाच वर्षांसाठी लेखी करार झाला आहे. करारानुसार निवडणुकीनंतर प्रथम १५ महिने महापौरपद सेनेने आपल्याकडे ठेवले. उर्वरित १२ महिने भाजपला देण्यात आले. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अडीच वर्षे सेनेकडे महापौरपद राहणार असल्याने भाजपमधील काही इच्छुकांनी युती तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून मागील काही दिवसांपासून भाजप महापौर निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची ‘हवा’ करण्यात आली. अडीच वर्षांपासून महापालिकेत युतीचा संसार सुखाने सुरू असताना फक्त महापौरपदासाठी पक्षाला कशाला बदनाम करायचे, असा सूर भाजप नेत्यांनी आळवला आहे. विशिष्ट मंडळींसाठी पक्षाला बदनाम करायचे नाही, अशीही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. भाजपने आता युती तोडली तर येणाºया अडीच वर्षांमध्ये वॉर्ड सभापती, स्थायी समिती अशा अनेक पदांना मुकावे लागणार आहे. महापालिकेत भाजपचे संख्याबळ एमआयएमपेक्षाही कमी आहे. भाजपकडे चिन्हावर निवडून आलेले फक्त २३ नगरसेवक आहेत. गजानन बारवाल यांच्या अपक्ष आघाडीने भाजपला आजपर्यंत पाठिंबा दर्शविला आहे. येणाºया महापौर निवडणुकीत बारवाल यांना भाजपचा ‘व्हीप’ही चालणार नाही. या अपक्ष आघाडीने सेनेसोबत घरोबा केला तर भाजपची प्रचंड नाचक्की होऊ शकते. कारण बारवाल आणि घोडेले यांचे स्नेहसंबंध संपूर्ण शहराला माहीत आहेत.

Web Title:  There is no BJP candidate for the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.