शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए..."; सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:34 IST

''ते येतील भाषण करून जातील, त्यांना जास्त महत्व देऊ नका''

औरंगाबाद : 'भोंगा' लावण्याच्या अल्टीमेटमनंतर राज ठाकरे ( MNS Raj Thackeray ) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. यावर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी आज खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'ते येतील भाषण देतील अन जातील, त्यांना जास्त महत्व कशाला देता ? दूरदर्शन पाहून कंटाळा आला, तर आपण स्टारप्लस लावा, थोडा एंटरटेनमेंट भी होना चाहिए ना'' असा खोचक टोला खा. सुळे यांनी लगावला आहे.त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलत होत्या.

राज ठाकरे यांनी 'अजान'वर भाष्य करत संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. यावेळी केलेल्या भाषणात राज यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. तसेच औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. आज राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे शहरात आल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खा. सुळे यांनी ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.''रोज रोज दूरदर्शन पाहून कंटाळा आला आहे. कधी तरी स्टार लावा. थोडा एंटरटेनमेंट होना चाहिए'' अशी खोचक टीका सुळे यांनी केली. ''ते येतील भाषण करून जातील, त्यांना जास्त महत्व देऊ नका'' असा सल्लाही सुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. 

राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणादरम्यान, राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. भोंगे हटविण्याचा विषय मुस्लीम बांधवांनी धर्मावर नेऊ नये. हा सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस