शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'हॉस्टेलमध्ये त्रास होतोय',विद्यार्थिनीने भावाला सांगितले होते; आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 13:07 IST

हॉस्टेममध्ये आत्महत्येपूर्वी दिली होती भावाला त्रासाची माहिती, याबाबत लेखी तक्रारही केली होती

औरंगाबाद : वाणिज्य शाखेतील आरती सर्जेरावं कोल्हे या विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंकाळी देवगिरी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख नव्हता तर केवळ जीवनावर भाष्य केल्याचे आढळून आले होते. दरम्यान, बहिणीला वसतिगृहात त्रास होता याबाबत लेखी तक्रारही देण्यात आली होती, अशी माहिती आरतीच्या भावाने दिली आहे. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. 

देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर ४४ मध्ये बी.कॉम प्रथम वर्षातील आरतीने (२०, रा. गुरुपींप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. मात्र, या प्रकरणात आता नवीन वळण मिळालं आहे. आत्महत्या करण्याच्या काहीदिवस अगोदर आरतीने भाऊ गणेशला वसतिगृहात त्रास होत असल्याची माहिती दिली होती. या संदर्भात वसतिगृहात लेखी तक्रार देखील केली होती, अशी माहिती गणेश कोल्हेने  दिली आहे. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी आरतीच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन सुरु आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

आरतीचे वडील शेतकरी असून मोठ्या बहिनीचे लग्न झालेले आहे. १ ऑगस्टपासून ती वसतिगृहात शिकण्यासाठी आली होती. लहान बहीण व भाऊ शिक्षण घेत आहेत. आरती शांत स्वभावाची होती. फारशी बोलत नव्हती. तिला नैराश्य का आले? या घटनेच्या मागील कारणांचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत. तिच्या मृत्यूमुळे विद्यार्थिनींतून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीने वसतीगृह चांगले आहे. मैत्रिणींबद्दल काही तक्रार नाही. याशिवाय वैय्यक्तिक बरेच काही लिहिले आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. 

'काळ्याकुट्ट जगात जगायचे नाही' , सुसाईड नोट सापडली‘जीवन हे सुंदर आहे.’ असे म्हणून तिने लिहायला सुरू केलेल्या पत्रात ‘जीवनात हार्ड वर्क केले पाहिजे. मीपण हार्ड वर्क करणार आहे. मी एक महिन्यापूर्वी इथे आले. माझे वसतिगृह, काॅलेज छान आहे. मैत्रिणीही खूप चांगल्या आहेत. मला जीवनाचा कंटाळा आलाय. मला या काळ्याकुट्ट जगात जगायचे नाही. हे ओझे कसे सांभाळायचे, मी गेल्यानंतर एकही मैत्रिणीने हॉस्टेल सोडू नका.’ असा आशय असून शेवटचा शब्द ‘अलविदा’ लिहिला आहे. या अडीच पानांच्या चिठ्ठीतून तिला नेमके काय म्हणायचे, तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबद्दल संभ्रम आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी