शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
4
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
5
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
6
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
7
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
8
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
9
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
10
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
11
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
12
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
13
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
14
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
15
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
16
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
17
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
18
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
19
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
20
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

लेटरहेडवर नोंदणी क्रमांकच नाही, खर्चाचा तपशील कोणाकडे ? विद्यादीप बालगृहाच्या कारभारावर गंभीर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:37 IST

बालगृहावर नियंत्रण ठेवणाऱ्या अन्य शासकीय विभागांच्या कार्यशैलीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- सुमित डोळे

छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहात चालणाऱ्या छळाविषयी गंभीर गौप्यस्फोट होत असताना त्याच्या अधिकृततेविषयीच गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बालगृह प्रशासनाने त्यांच्या अधिकृत लेटरहेडवर नियमाने बंधनकारक असलेला शासनाकडील नोंदणी क्रमांकाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याची नवी बाब आता उघडकीस आली आहे.

बालगृहावर नियंत्रण ठेवणाऱ्या अन्य शासकीय विभागांच्या कार्यशैलीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुठल्याही सामाजिक संस्थेच्या लेटरहेडवर शासनाकडे नोंदणी क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक असतो. मात्र, विद्यादीप बालगृहाकडून विविध शासकीय विभागांना केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारात अनेकदा हा नाेंदणी क्रमांक नसलेल्या लेटरहेडचा वापर केला जात होता. ते कोणाच्या वतीने चालवले जाते, संबंधित जबाबदार व्यक्ती, पदांचाही उल्लेख त्यात नसल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक मुलीसाठी अडीच हजारांचा निधीबालगृहात मुलींना कमी प्रमाणात आहार दिला जायचा. मासिक पाळीदरम्यान जाणीवपूर्वक अपुरे सॅनिटरी नॅपकिन दिले जात. स्टोअर रूमची जबाबदारी असलेल्या केअर टेकर, नर्स मुलींना अल्प साहित्यातच राहण्याचा दम देत. मात्र, शासनाच्या वतीने येथील प्रत्येक मुलीच्या खर्चासाठी अडीच हजार रुपयांचा निधी दिला जात होता. अशा तेथे मूळ ८० व पलायन केलेल्या ८९ मुली वास्तव्यास होत्या. या निधीचा कसा वापर झाला, साहित्याचा वापर कसा केला गेला, अन्य सेवाभावी संस्थांकडून आलेल्या निधीचे काय झाले, याचा बालगृहाकडे कुठलाच ताळमेळ नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पूर्वीच्या तक्रारींचे काय झाले ?- नोव्हेंबर २०२३ मध्ये याच बालगृहाच्या अधीक्षक व कर्मचाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. बालकल्याण समितीकडून तपास काढून तो पोलिसांकडे देण्यात आल्याने टीका करण्यात आली होती. संस्थेत उपाशी ठेवले जाते, लहान मुलींकडून स्वयंपाक, टॉयलेटची स्वच्छता करून घेतली जात असल्याचे गंभीर आरोप तेव्हाही करण्यात आले होते. मात्र, त्या वेळेसदेखील चौकशी साेयीस्कररीत्या गुंडाळली गेली.- सामाजिक संस्था, ट्रस्ट किंवा एनजीओसाठी त्यांच्या लेटरहेडवर शासकीय नोंदणी क्रमांकाचा उल्लेख करणे बंधनकारक असतो. पारदर्शकतेच्या दृष्टीने, संस्थेची अधिकृत ओळख पटवण्यासाठी, तसेच विविध निधी मिळवताना विश्वासार्हता दर्शवण्यासाठी ते महत्त्वाचे असते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट कायद्यानुसार संस्थेने पत्रव्यवहारात ट्रस्टची नोंदणी क्रमांक व नोंदणीचा संदर्भ देणे अपेक्षित असते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी