शहरं
Join us  
Trending Stories
1
३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
2
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
3
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
4
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
5
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
6
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
7
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
8
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
9
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
10
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
11
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
12
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
13
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
14
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
15
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
16
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
17
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
18
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
19
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
Daily Top 2Weekly Top 5

'...तर अंबादास दानवेंना सरळ करेल'; छ. संभाजीनगरमध्ये 'खैरे विरुद्ध दानवे' पुन्हा जुंपली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:14 IST

मतदानानंतर चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंना इशारा

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "अंबादास दानवेला अक्कल नाही, तो माझ्यावर अविश्वास दाखवत असेल तर १६ तारखेनंतर मी त्याला सरळ करीन," अशा शब्दांत खैरेंनी स्वपक्षीय नेत्यावरच संताप व्यक्त केला आहे.

अंतर्गत वाद चव्हाट्यावर खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, "मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणूनच आजवर टिकलो आहे. तुम्ही आतून काय केलंय हे मला चांगलं माहित आहे. दानवे गेल्या चार दिवसांपासून गायब आहे, आम्ही त्याला शोधतोय पण तो सापडत नाहीये. निकालांनंतर मी मोठी पत्रकार परिषद घेऊन सगळं उघड करणार आहे." या विधानामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

भाजप आणि शिंदे गटावर 'पैसे वाटपा'चा आरोप निवडणुकीत पारदर्शकता नसल्याचा दावा करत खैरेंनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले. "आशिष शेलार मुंबईतून आता तडीपार होणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे लोक शहरात पैसे वाटप करून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही जनतेची कामं का करत नाही? फक्त मतदानासाठी पैसे का देता?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संजय शिरसाठ यांच्या 'तिळगुळ' वाटपाच्या दाव्याला त्यांनी 'राजकीय नाटक' म्हणत फेटाळून लावले.

९९ वर्षीय मातेसह मतदान खैरेंनी आपल्या ९९ वर्षीय वृद्ध मातेसह आणि संपूर्ण परिवारासह मतदान केले. त्यानंतर राजकीय फटकेबाजी सुरू केली, "माझी आई ९९ वर्षांची आहे, तिला चालता येत नाही तरीही तिने बसून सर्व कामे पूर्ण केली आणि मतदानाला आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून आम्ही उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले आहे," असे त्यांनी भावनिक होत सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Khair vs. Danve feud reignites in Chhatrapati Sambhajinagar post-election!

Web Summary : Chandrakant Khaire threatened Ambadas Danve after voting, alleging incompetence and internal conflict. Khaire accused BJP and Shinde group of distributing money for votes. He voted with his 99-year-old mother, expressing faith in Thackeray's leadership.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवे