शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

...तर विद्यापीठातील सभागृह झाले असते जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 18:28 IST

विद्यापीठातील नाट्यगृहात प्राचार्यांची बैठक सुरू होती. ही बैठक अंतिम टप्प्यात आली असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूने एकाएकी धुराचे लोळ येऊ लागले

- राम शिनगारे 

औरंगाबाद : शहरातील सुसज्ज नाट्यगृहांमध्ये एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहांचा समावेश होतो. विद्यापीठातील नाट्यगृहात प्राचार्यांची बैठक सुरू होती. ही बैठक अंतिम टप्प्यात आली असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूने एकाएकी धुराचे लोळ येऊ लागले; मात्र कर्मचाऱ्यांनी तात्काळ इलेक्ट्रिकच्या मेन स्वीचकडे धाव घेत सर्व बटने बंद केली अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला.

विद्यापीठातील भव्यदिव्य नाट्यगृहात दुपारी तीन वाजता प्राचार्यांची बैठक प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्याडॉ. वैशाली प्रधान बोलत होत्या. तेव्हाच व्यासपीठाच्या उजव्या बाजूने एकाएकी धुराचे लोळ येऊ लागले. शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच व्यासपीठाच्या आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिकच्या मुख्य स्वीचकडे धाव घेत, एसीसह इतर यंत्रणा बंद केली. तेव्हा तात्काळ धूर कमी झाला. हा धूर येताच बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले. 

या घटनेमुळे प्राचार्य, प्राध्यापकांमध्ये गोंधळ उडाला; मात्र प्रकुलगुरू डॉ. तेजनकर यांनी धूर बंद झाल्यानंतर सर्वांना बसण्याचे आवाहन केले. एसीची सर्व यंत्रणा बंद केली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे मात्र २२ एप्रिल २००७ रोजी हेच सभागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना जळून खाक झाल्याची आठवण झाली. 

देखभाल, दुरुस्तीची गरजया घटनेनंतर सभागृहातील एसीच्या परिस्थितीची पाहणी केली असता, मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती केलेली नसल्याचे दिसून आले. युवा महोत्सवात सतत तीन दिवस एसीची यंत्रणा सुरू होती. यामुळेही ताण आलेला असू शकतो, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर प्रकुलगुरू डॉ. तेजनकर यांनी स्थावर विभागाच्या अभियंत्यांना सर्व तांत्रिक यंत्रणा दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. या सभागृहाच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चही मोठा आहे. विद्यापीठाला हा पांढरा हत्ती पोसणेही कठीण असल्याचे अधूनमधून कानी येत असते; मात्र प्रशासन त्याविषयी अधिक गंभीर नाही. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादfireआगAurangabadऔरंगाबाद