शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मंदिरात आत्मदहन करणार; पालखीस परवानगी नाकारल्याने ज्ञानेश्वर महाराजांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 18:04 IST

Ashadhi ekadashi : 'याबाबत लवकर निर्णय घ्यावा, प्रशासनाने मला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मी मंदिरात पेटवून घेईल'

ठळक मुद्दे२५ वारकऱ्यासह वाहनाने पंढरपूरला जाण्याची परवानगी द्या. चंद्रभागेत स्नान करून आम्ही परत फिरू. 

पैठण (औरंगाबाद ) : संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या मातापित्यांच्या पालखीस परवानगी नाकारल्याने आपेगाव मंदिराचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी मंदिरातच आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे. 'याबाबत लवकर निर्णय घ्यावा, प्रशासनाने मला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर मी मंदिरात पेटवून घेईल', अशी टोकाची भूमिका ज्ञानेश्वर महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केली. यामुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव ता. पैठण येथून पंढरपूर आषाढी वारीची गेल्या ८४२ वर्षांपासून परंपरा चालत आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा गतवर्षी खंडीत झाली. या वर्षी मात्र राज्य शासनाने मानाच्या दिंडीसहीत आणखी दोन दिंड्यांना पंढरपूर वारीसाठी परवानगी दिली. मात्र, राज्य शासनाने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमितून निघणाऱ्या पालखीस परवानगी नाकारली. यावर मंगळवारी आपेगाव येथे पत्रकार परिषदेत हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी भूमिका मांडली. 

यावेळी हभप शिवाजी महाराज सेलूकर, रामचंद्र औटे, भाऊसाहेब औटे, अण्णासाहेब औटे व वारकरी उपस्थित होते.  यावेळी ज्ञानेश्वर महाराज यांनी मोजक्या पालखी सोहळ्यास परवानगी देताना राज्य सरकारने कोणते निकष लावले असा प्रश्न उपस्थित केला. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला अशा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमितून निघणाऱ्या पालखीस परवानगी नाकारल्याने संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. आपेगाव येथून निघणाऱ्या पालखीची नोंद शासकीय गँझेट मध्ये आहे. पालखीस परवानगी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला. परंतु, याबाबत दखल घेण्यात आली नसल्याने वारकऱ्यासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सोबत १८ जिल्ह्यातील वारकरी आत्मदहनाचा मार्ग स्विकारणार असल्याचे ही  ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले. परवानगीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. परवानगी मिळाली नाही तर दि. १२ जुलै रोजी आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदीरात वारकऱ्यासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

या आहेत मागण्या... पायी वारीचे आम्ही समर्थन करीत नाहीत. २५ वारकऱ्यासह वाहनाने पंढरपूरला जाण्याची परवानगी द्या. पंढरपूर प्रवेश व प्रदक्षिणा नाकारली तरी चालेल, चंद्रभागेत स्नान करून आम्ही परत फिरू. 

२ जुलै रोजी झाले औपचारिक प्रस्थान....संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या माता पिता पालखीचे आपेगाव येथून दि २ जुलै रोजी पंढरपूर वारीसाठी औपचारिक प्रस्थान झाले असून पालखी आपेगाव येथील मंदीरात मुक्कामी आहे. राज्य शासनाने परवानगी दिली तर पालखी दि. १८ रोजी मोजक्या वारकऱ्यासह वाहनाने पंढरपूरकडे रवाना होईल. परंतु, राज्य सरकारने निर्णय १२ जुलैच्या आत घोषित करावा. 

राज्य शासनाने परवानगी दिलेल्या दहा पालख्या....संत एकनाथ महाराज ( पैठण, औरंगाबाद ), संत निवृत्ती महाराज ( त्र्यंबकेश्वर, नाशिक ), संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड, पुणे ), संत सोपानदेव महाराज ( सासवड, पुणे ), संत मुक्ताबाई  ( मुक्ताईनगर, जळगाव ), रुक्मिणी माता  ( कौडन्यपूर, अमरावती ), संत तुकाराम महाराज ( देहू, पुणे ), संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी, पुणे ), संत नामदेव महाराज ( पंढरपूर, सोलापूर ) व  संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर,अहमदनगर ) या संस्थानच्या पालखी सोहळ्यास यंदा राज्य शासनाने परवानगी दिली आहे.  तसेच सासवड व अमरावती संस्थानच्या पालखीस परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार