शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

...तर केंद्राकडे राज्यसरकार भाड्याने चालविण्यासाठी द्या; भाजपचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:17 IST

उठसूट सर्वच केंद्रशासनाकडे मागायचे असेल तर केंद्रशासनालाच हे सरकार भाड्याने चालविण्यासाठी देण्यात यावे, असा टोला भाजपाचे माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी लगावला.

ठळक मुद्देराज्याने मराठवाडा वॉटरग्रीडसाठी केंद्राकडे मागितले ११ हजार ५८२ कोटीकोरोनामुळे काही करता आले नाही, आगामी काळात पक्ष रस्त्यावर उतरेल.

औरंगाबाद: राज्य सरकारला मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना करण्याची इच्छा नाही. गुरूवारी मुंबईत मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत या योजनेबाबत ठोस असा निर्णय झाला नाही, उलट केंद्र शासनाकडेच ११ हजार ५८२ कोटींची मागणी महाविकास आघाडी सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे. उठसूट सर्वच केंद्रशासनाकडे मागायचे असेल तर केंद्र शासनालाच हे सरकार भाड्याने चालविण्यासाठी देण्यात यावे, असा टोला भाजपाचे माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला.

या योजनेसाठी हायकोर्टात जाण्याची तयारी केली असून वेळप्रसंगी अधिवशेनात देखील सरकारला जाब विचारण्यात येईल, असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले. आजवर तीन अधिवेशन झाले, परंतू या योजनेबाबत सरकारने काहीही निर्णय घेतला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे याेजनेबाबत शंका उपस्थित करतात. पश्चिम महाराष्ट्राने कायम मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली आहे, त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा या योजनेला विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. योजनेला खीळ बसणे ही राष्ट्रवादीचे पाप असल्याचा आरोप करून आ.लोणीकर म्हणाले, आजवर १० डीपीआर झाले आहेत, परंतु सरकारने योजनेला पुढे नेले नाही. सर्व काही ठप्प ठेवले. कोरोनामुळे अडचणी असल्या तरी योजनेचे काम करण्याबाबत सकारत्मकता सरकारने दाखविली नाही. त्यामुळे ही योजना सरकारला राबवायचीच नाही. जे जलतज्ज्ञ ग्रीडला विराेध करीत आहेत. त्यांनी सगळे डीपीआर पुन्हा एकदा तपासून पहावेत. त्यानंतर कामाची डेडलाईन सरकारने ठरविली पाहिजे.

भाजप योजनेसाठी रस्त्यावर उतरेलगोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ, जलसंपदा, पाणीपुरवठाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात योजनेबाबत समन्वय नाही. सरकारकडे पैसा नाही, त्यामुळे केंद्राकडे अनुदान मागितले तर भाजपाने देखील पुढाकार घेतला पाहिजे, यावर आ.लोणीकर म्हणाले, केंद्राकडून मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण त्यासाठी महामंडळ, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागात समन्वय ठेवण्याचे काम सरकारचे आहे. दीड वर्षापासून सरकार वेळ मारून नेत आहे. विभागात भाजपाचे १६ आमदार, ४ खासदार असतांना या योजनेसाठी पक्ष आजवर आग्रही का राहिला नाही, यावर लोणीकर म्हणाले, कोरोनामुळे काही करता आले नाही, आगामी काळात पक्ष रस्त्यावर उतरेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार