शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानपुऱ्यात भरदुपारी चोरी; प्राध्यापकाचा फ्लॅट फोडून सोन्याचांदीचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:42 IST

Theft, Crime news in Aurangabad फ्लॅटला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी दाराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला.

ठळक मुद्देबेड रुममधील कपाट तोडून त्यातील सोन्याचे चार तोळ्याचे दागिने आणि रोख ८ हजार रुपये पळवले समोरील फ्लॅटमधील रहिवासी कंपनीत नोकरी करतात ते रोज सकाळी कामावर जातात आणि सायंकाळी येतात

औरंगाबाद: उस्मानपुऱ्यातील प्राध्यापकाचा बंद फ्लॅट भरदुपारी फोडून चोरट्यानी सोन्या चांदीचे दांगिने आणि रोख ८ हजाराची रक्कम लंपास केली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी सांगितले की, शासकीय तंत्रनिकेतन येथे विभागप्रमुख असलेले प्रा. राजू तुकाराम पचकोर हे उस्मानपुरा येथील अक्षय अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी दिवाळीपासून गावी गेलेली आहे. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ :१५ वाजेच्या सुमारास ते फ्लॅटला कुलूप लावून तंत्रनिकेतनमध्ये गेले होते. त्यांच्या फ्लॅटला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी दाराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. बेड रुममधील कपाट तोडून त्यातील सोन्याचे चार तोळ्याचे दागिने आणि रोख ८ हजार रुपये चोरून आरोपी पसार झाले.

दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी प्रा.पाचकोर हे घरी परतले तेव्हा त्यांना फ्लॅटचा कडीकोंडा तुटलेला दिसला. चोरट्यांनी घर फोडल्याचे दिसताच त्यांनी घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसाना कळविली. पोलीस आल्यावर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील ३.४ ग्रॅम चे कानातील झुंबर, १० ग्रॅम सोन्याची मण्याची पोत, ओम पत्ते २, रिंग, नथ, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख ८ हजार असा सुमारे चार तोळ्याचे दागिने, चांदीचे ताट, वाटी,प्लेट, अत्तरदाणी असा ऐवज चोरट्यानी पळविल्याचे त्यांना दिसले. याप्रकरणी त्यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. 

आदल्या दिवशी वॉचमन गेला गावाला अक्षय अपार्टमेंट मध्ये तळमजल्यावर गोपाल नावाच्या वॉचमन सहपरिवार राहतो. मात्र तो २१ डिसेंबर रोजी गावाला गेल्याचे त्यांना समजले. तर त्यांच्या समोरील फ्लॅटमधील रहिवासी कंपनीत नोकरी करतात ते रोज सकाळी कामावर जातात आणि सायंकाळी घरी परतत असतात. ही संधी साधून चोरट्यानी फ्लॅट फोडला. गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळाची पहाणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरी