शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामावर सुट्टी टाकून ‘लम्पी’ला रोखण्यासाठी उतरली तरुणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 08:42 IST

व्हाॅईस फॉर स्पीचलेस या संस्थेतील तरुणांची फौज पशुधन वाचविण्याची मोहीम राबवित आहे.

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोणी बँकिंग क्षेत्रात, कोणी हाॅटेलिंग, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये, तर कोणी सिक्युरिटी क्षेत्रात, कोणी विद्यार्थी, पण कामावर सुट्टी टाकून यातील तरुणाई ‘लम्पी’ला रोखण्यासाठी गावागावांतील रस्त्यांवर उतरली आहे. ही तरुणाई श्वानासह इतर प्राण्यांसाठी आजपर्यंत काम करीत होती. लम्पी प्रकोपाच्या संकटात आता पशुधन वाचविण्यासाठी ते लसीकरणासाठी रात्रीचा दिवस करून प्रयत्न करीत आहेत. पशुसंवर्धन विभागाबरोबर स्वत:च्या पैशांमधूनही लसी घेऊन पशुधन सुरक्षा देण्यासाठी झटत आहेत.   

व्हाॅईस फॉर स्पीचलेस या संस्थेतील तरुणांची फौज पशुधन वाचविण्याची मोहीम राबवित आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते तुडवत पशुधनाच्या लसीकरणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यासाठी त्यांना पशुसंवर्धन विभागाची मदत आणि मार्गदर्शन मिळत आहे. संस्थेचे सदस्य गोविंद इनामदार, रोहित राठोड, जफर शेख, आदित्य देशमुख, सुमित इंगळे, प्रमोद वाघ, सागर कसाब, प्रतीक जाधव आदी यासाठी प्रयत्नशील आहेत. 

६०० पशुधनाचे लसीकरणगेल्या काही दिवसांत ६०० पशुधनाचे लसीकरण केले आहे. यात ३०० लसी पशुसंवर्धन विभागातर्फे मिळाल्या आहेत. इंजेक्शन देणाऱ्या डाॅक्टरांचा खर्चही आम्ही करीत आहोत. उर्वरित लसी स्वत:च्या खर्चातून घेतल्या. गोरक्षक किरण सुरे,  जिल्हा प्राणी क्लेशप्रतिबंधक समितीच्या राजपूत,  पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुभाष वानखेडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे पाठबळ मिळाले.- गोविंद इनामदार, व्हॉइस फॉर स्पीचलेस

टॅग्स :cowगायAurangabadऔरंगाबाद