शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

तरुणाची हत्या करून म़ृतदेह साई टेकडी परिसरात फेकला

By सुमित डोळे | Updated: December 16, 2023 19:31 IST

दोन दिवसांपुर्वी महिलेची तरुणाविरोधात तक्रार, लिव्ह इन रिलेशनशिपच्या प्रकरणातून खुनाचा संशय

छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुऱ्यातील कबीरनगरमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय आनंद साहेबराव वाहुळ (२७) याची अज्ञातांनी क्रूर हत्या केली. हत्या करून मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह साई टेकडी परिसरात फेकून दिला. गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना हा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. दरम्यान, आनंद काही वर्षे एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्या प्रकरणातूनच ही हत्या झाल्याचा दाट संशय पोलिसांना असून शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू झाला होता.

रिक्षाचालक असलेला आनंद काही दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात मुंबईला गेला होता. आठवड्यापूर्वी तो शहरात परतला. चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहिलेल्या महिलेला तो भेटायला गेला. मात्र, महिलेने त्याच्याशी पुन्हा संपर्क ठेवण्यास नकार दिला. आनंद मात्र ऐकायला तयार नव्हता. महिलेने १३ डिसेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जात त्याच्या विरोधात तक्रार दिली. घरी बळजबरीने येणे, धिंगाणा घालत असल्याचे आरोप महिलेने केले. त्यावरून त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर आनंद घरी परतलाच नाही. इतरत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनीदेखील त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.

संशय महिलेवरचमहिलेने तक्रार दिल्यानंतरच आनंद बेपत्ता झाल्याने त्याच्या हत्येच्या संशयाची सुई आनंद लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेकडेच अधिक आहे. आनंद पुन्हा घरी आल्याचे कळाल्यानंतर महिलेच्या मुलाने त्याला घरात कोंडले. अन्य दोघांंच्या मदतीने तो बेशुद्ध पडेपर्यंत त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर वाहनातून साई टेकडी परिसरात फेकून दिले. गुरुवारी फिरायला गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह आढळून आला. चिकलठाणा पोलिसांनी आसपासच्या ठाण्यांमध्ये बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासल्यावर त्याची ओळख पटली.

रात्री गुन्ह्याची प्रक्रिया सुरूशुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर पोलिसांनी महिला, तिच्या मुलाचा शोध सुरू केला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी