शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती जिंकलेला पहिलवान झाला गायब; यात्रेत वादाची ठिणगी पडल्याने दोन गटात पेटली दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 19:15 IST

पहेलवान व अन्य एकाला गायब केल्याचा नातेवाईकांचा आरोप

चित्तेपिंपळगाव : आडगाव येथे पौष पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या दंगलीमध्ये वडखा येथील पहिलवानास पराभूत करुन देवळाईच्या पहिलवानाने कुस्ती जिंकली आणि वादाची ठिणगी पडली. वादाचे रुपांतर दंगलीमध्ये झाले. जोरदार दगडफेक सुरू झाली. संयोजक व पहिलवानात फ्रिस्टाईल मारामारी झाली. दगडफेकीत उपसरपंचासह देवळाईतील तीनजण गंभीर जखमी झाले असून पहिलवानासह एकास गायब केल्याचा आरोप नातेवाईकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी झाली. रात्री उशिरापर्यंत उपअधीक्षक भवर व चिकलठाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी बेपत्ता तरुणांचा शोध घेत होते.

कोरोनामुळे दोन वर्षे यात्रेवर बंधने होती. यंदाही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना ग्रामस्थांनी विनापरवानगी यात्रा भरविली. कुस्तीची दंगलही आयोजित केली. त्यानंतर सायंकाळी कुस्ती जिंकल्यावरुन खेळात दुजाभाव केला असा आरोप करीत कुस्ती जिंकलीच नाही, परत खेळा मी तयार आहे. असे म्हणत पराभूत वडखा येथील पहिलवानाने गोंधळ घातला. त्याचवेळी अज्ञाताने गर्दीवर दगडफेक केली आणि एकमेकांवर दगडाचा वर्षाव सुरू झाला. संयोजकांनी पहेलवान मुदत्सीर इद्रीस खान, साथीदार जुबेर यूसूफ शेख, अबू सालेब जहुर शेख, आबुजर इद्रीस खान यांना मारहाण केली. दगडफेकीमुळे लोक सैरावैरा पळत होते.

जखमींवर खाजगीत उपचार सुरूउपसरपंच अशोक लोखंडे यांना छातीत मुका मार लागला असून, त्यांना तसेच जुबेर यूसूफ शेख, अबु सालेब जहुर शेख, आबुजर इद्रीस खान यांना शासकीय दवाखान्यातून खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

बेपत्तांची उशिरापर्यंत शोधमोहिमदेवळाई येथील विजयी पहेलवान मुदत्सीर इद्रीस खान, समीर खान आयुब खान या दोघांचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांना शोध लागला नव्हता. नातेवाईकांचा आरोप आहे की, दोघांना गावकऱ्यांनीच डांबून ठेवले असावे. रात्री चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. पोलीस अधीक्षकानी दिलेल्या सूचनांनुसार पोलिसाच्या पथकाने जाऊन बेपत्ता पहिलवानांची शोधमोहिम राबविली. अन्य तीन जणांची एका घरातून सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद