शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'काळ आला होता, पण..; सीटबेल्टमुळे वाचले महिलेचे प्राण, बसला धडकताच उघडली एअर बॅग

By सुमित डोळे | Updated: November 23, 2023 12:35 IST

क्रांती चौकात सकाळी सिग्नल सुरू न झाल्याने कार, सिटी बसचा अपघात

छत्रपती संभाजीनगर : क्रांती चौकात सकाळी नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू न झाल्याने सिटी बस व कारची धडक होऊन अपघात झाला. धडक जोरात होती. मात्र, कारचालक महिलेने सीटबेल्ट लावलेला असल्याने तत्काळ एअर बॅग उघडल्याने तिचा जीव वाचला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात घडला.

अल्पना सोमाणी या बुधवारी सकाळी त्यांच्या कारने मुलीला नाथ व्हॅली शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. तिला सोडून पुन्हा उस्मानपुरा मार्गे परतत असताना त्यांनी क्रांती चौकातून वळण घेतले. त्याच सुमारास बाबा पेट्रोलपंपाकडून आलेली बस व कारची बसच्या पुढील बाजूला धडकली. अपघाताने घाबरलेल्या अल्पना यांना स्थानिकांनी धाव घेत तत्काळ रुग्णालयात नेले.

म्हणून सीटबेल्ट आवश्यकअल्पना यांची कार बसला धडकल्यानंतर काहीशी वर उडाली. यात कारचा समोरील बाजूने चुराडा झाला. परंतु अल्पना यांनी सीटबेल्ट लावलेला असल्याने एअर बॅग उघडल्याने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. सोमाणी कुटुंबाने देखील अल्पना यांचा जीव वाचणे महत्त्वाचे असल्याचे सांगून कोणाही विरोधात तक्रार नसल्याचे सांगितले.

सिग्नल सुरू होईपर्यंत वाहने सुसाटशहरातील बहुतांश सिग्नल सकाळी ९ वाजता सुरू होतात. परंतु क्रांती चौक, भगवान महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप), सेव्हन हिल मध्ये सकाळी ८ वाजेपासून रहदारी सुरू होते.परंतु सिग्नल सुरू नसल्याने वाहने सुसाट जातात. अनेकदा वाहनचालक गोंधळून जातात. त्यामुळे महत्त्वाच्या चौकातील सिग्नल लवकर सुरू करावेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात