शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा वाकलेला पाय गुडघ्याखालील हाड कापून केला सरळ; सांधेरोपण, मोठी शस्त्रक्रिया टळली

By संतोष हिरेमठ | Updated: December 22, 2023 19:07 IST

विशेष म्हणजे मोठी चिरफाड टाळत केवळ गुडघ्याखालील पायाचे हाड कापून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : वय ३५ वर्षे, उंची ५ फूट २ इंच, वजन ७० किलो अशा सर्वसामान्य परिस्थितीतही एका महिलेचा पायच वाकला होता, ही व्याधी काही जन्मजातही नव्हती, तरी तिचे चालणेच बंद झाले. अशा वेळी घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून महिलेचा पाय सरळ केला. विशेष म्हणजे मोठी चिरफाड टाळत केवळ गुडघ्याखालील पायाचे हाड कापून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात दहा दिवसांपूर्वी ही महिला दाखल झाली. गेल्या दोन वर्षांत महिलेचा उजव्या पायाचा गुडघा आणि टाचेदरम्यान भाग वाकला. पायाला मोठ्या प्रमाणात सूजही आली. त्यामुळे महिलेला चालणेही कठीण होऊ लागले. त्यामुळे दैनंदिन काम करणे अवघड होत होते. अशा परिस्थितीत त्या घाटीत दाखल झाल्या. अशा अवस्थेतील महिलेच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डाॅक्टरांनी घेतला आणि शस्त्रक्रिया यशस्वीही केली. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. अनिल धुळे यांनी ही शस्त्रक्रिया केली. डाॅ. मशुदुल, डाॅ. ऋषिकेश जाधव, डाॅ. मुकुंद परचुंडीकर, ओटी इन्चार्ज सिस्टर सिंधू निकम, सुरेखा चंद्रशेखर, उषा पवार, भाग्यश्री शिंदे आदींनी सहकार्य केले.

कशी केली शस्त्रक्रिया?शस्त्रक्रिया करून गुडघ्याखालील हाडाला कापण्यात आले. रिंग आणि राॅडच्या मदतीने हाडाला ‘प्रेशर’ देण्यात आले. कापण्यात आलेल्या हाडाचे भाग भरण्यास आणि हाड पूर्णपणे मजबूत होण्यास मदत होते. अशा पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच महिला वेदनामुक्त झाली.

अतिवजनाचा परिणामडाॅ. अनिल धुळे म्हणाले, महिलेचा पाय वाकला गेला होता. स्थिती अशीच राहिली तर त्या महिलेवर सांधेरोपणाची वेळ ओढावली असती. सांधेरोपणासाठी किमान एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो; परंतु सांधेरोपण टळले आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्य