शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

जयभीमच्या जयघोषाने पैठण दणाणले,अभूतपूर्व उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:47 IST

आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी पुतळा परिसरात येऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

पैठण ( औरंगाबाद): पैठण शहरातील बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री अभूतपूर्व उत्साहात रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. जयभीमच्या गगनभेदी घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्याने अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी पुतळा परिसरात येऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. सोमवारी तालुक्यातील चितेगाव येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होते. चितेगाव ते पैठण दरम्यान रस्त्यावरील गावांगावांमध्ये सडा रांगोळी, कमाणी उभारून पेढे वाटत पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

चितेगाव येथून पुतळा पैठण शहरात पोहचेपर्यंत तब्बल १२ तासाचा कालावधी लागला.  पैठण शहरात पुतळ्याचे स्वागत करण्यासाठी सह्याद्री चौकात रात्रीचे १२ वाजलेले असतानाही महिला-पुरूष व तरूणांचा जनसागर उसळला. पुतळ्याचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत तरूणांनी जल्लोष केला. सह्याद्री चौक ते बसस्थानकापर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूने नागरीकांनी पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. रस्त्यावरील रोषणाई व उपस्थितीने रात्रीचा दिवस झाला होता. 

प्रत्येकाच्या मनामनात उत्साह संचारलेला दिसून आला. १३ फुट ऊंची असलेल्या लक्षवेधी पुतळ्याची निर्मिती अहमदनगर व कोल्हापूर येथील शिल्पकारांनी केली आहे. पुतळ्यासाठी रोहयो तथा संदिपान भुमरे यांनी स्वखर्चातुन १८ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. पैठण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणीच हा भव्य पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी पैठण-आपेगाव  विकास प्राधिकरणातून दोन टप्प्यात ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी या निधीची तरतुद करून दिली असून सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. 

मिरवणूकीचे ठिकठिकाणी स्वागत.....ढोलताशे, भगवे-निळे ध्वज व तुताऱ्यासह गुलाल व निळ ऊधळीत फटाक्यांच्या आतिषबाजीत  कौडगाव, ढोरकीन, धनगाव, ईसारवाडी, एमआयडीसी, मुधलवाडी, पिंपळवाडी व कातपूर राहुलनगर येथील ग्रामस्थांनी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत केले. मिरवणूक सुरू असताना औरंगाबादचे आमदार संजय सीरसाठ, आमदार अंबादास दानवे यांनी पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबादSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे