शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

मराठवाड्यातील ४६ नगर परिषदा, ८ जिप, ३ मनपांची मुदत संपली; सर्व ठिकाणी प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:47 IST

विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत आहेत

औरंगाबाद : मराठवाड्यातील ३ महापालिका, ८ जिल्हा परिषद आणि ४६ नगर परिषदांसह २ नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. लातूर, परभणी मनपाची मुदत मे २०२० मध्ये तर नांदेड-वाघाळा मनपाची मुदत ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदांवर प्रशासक काम पाहत आहेत. हिमायतनगरची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपली आहे. रेणापूर नगरपंचायतीची जून २०२२ तर संपणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपेल.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, गंगापूर, पैठण, बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, गेवराई, परळी, हिंगोलीतील कळमनुरी, हिंगोली, वसमतनगर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर, जालना, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उद्गीर, निलंगा, औसा, नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी, मुखेड, कंधार, बिलोली, देगलूर, मुदखेड, धर्माबाद, उमरी, हदगाव, भोकर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग, भूम, परंडा, मुरूम, उस्मानाबाद, कळंब, उमरगा या नगर परिषदांची मुदत संपली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पूर्णा, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, गंगाखेड नगर परिषदांमध्ये निवडणूक घ्यावी लागणार आहे.

फक्त चार न.प.मध्ये निवडणुका नाहीत औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेची मुदत एप्रिल २०२४, वैजापूर न.प. मे २०२३, नांदेड जिल्ह्यातील लोहा न.प.जानेवारी २०२४ तर किनवट न.प.ची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपणार आहे. बाकी उर्वरित ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सगळीकडे प्रशासकराजसर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्ण प्रत अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडूनच पूर्ण मार्गदर्शन येईल, तेव्हा माहिती मिळू शकेल. सध्या तरी विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत असल्याचे नगरपालिका प्रशासन सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक