शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आधीचा ‘ताे’ डेटा कुठेय?; समाजाने उपलब्ध करून दिले होते बहुतांश पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:30 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेतली होती.

-विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : राज्य मागासवर्ग आयोगाने मार्च २०१८ मध्ये मराठा हे कुणबी असल्याचा  संकलित केलेला डेटा कुठे आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण आणि शासनाने पुन्हा महसूल नोंदी तपासण्याचे सुरू केलेले काम, या पार्श्वभूमीवर आयोगाने संकलित केलेला डेटा आणि त्यावेळी समाजाने दिलेल्या पुराव्यांचे काय झाले, असा सवाल केला जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाने राज्यभरात ५८ मोर्चे काढले. त्यानंतर मागासवर्ग आयोगाने जिल्हानिहाय दौरे केले. मात्र तरीही आरक्षणाची मागणी आजतागायत कायम आहे.  

१४ लाखांत ४० हजार कुणबी सापडले शिक्षण विभागाने नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ९७८ शाळांमधील १४ लाख शाळांतील निर्गम उतारे आणि शाळा सोडल्याचे दाखले तपासले आहेत. त्यात तब्बल ४० हजार ६९१ प्रमाणपत्रावर कुणबी असल्याची नोंद आढळून आली आहे. सर्वच्या सर्व म्हणजे ३ हजार ७४० शाळातील रेकॉर्ड तपासणीनंतर हा आकडा काही लाखांच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. 

जनसुनावणीत दिली होती ३० हजार निवेदने

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेतली होती. यावेळी कुणबी-मराठा असा उल्लेख असणारी २०० वर्षे जुनी भांडी  आयोगाकडे सुपूर्द केली. बेगमपुऱ्यातील मराठा पंच कमिटीने २०० वर्षे जुनी तांब्याची डेग सादर केली होती. त्यावर मराठा-कुणबी असा स्पष्ट उल्लेख केलेला होता.  

१९६७ पूर्वीच्या दस्ताची तपासणी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत प्रशासनाने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व मुख्याध्यापकांना १९६७ पूर्वीचे शैक्षणिक दस्तावेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. प्रवेश निर्गम उतारे, शाळांच्या दाखल्यावर मराठा व कुणबी या नोंदीची माहिती घेण्यास आदेशान्वये सांगण्यात आले आहे. 

महसूलही  करतेय तपासणीमहसूल विभागाकडूनही गावनिहाय कोतवाली बुक, जन्म-मृत्यू नोंद, खासरापत्र, शेती खरेदी-विक्री दस्तऐवज, लग्न नोंदणी प्रमाणपत्र (ज्यांचे लग्न मराठवाडा-विदर्भ असे झाले असेल त्या जोडप्यांची लग्नपत्रिका), निजामकालीन किंवा त्यानंतरचा कुणबी नोंद असलेले दस्तऐवज शोधले जात आहेत.

राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधेयक आणायला सांगितले पाहिजे. जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते.- जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी

देवेंद्र फडणवीस ह मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ज्या पद्धतीने वेगळे आरक्षण दिले होते, त्याच पद्धतीने वेगळे आरक्षण द्यायला हवे. दुसऱ्या समाजात आरक्षण देणे योग्य होणार नाही.  - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप  

मराठा आरक्षण न्यायालयात न टिकण्यामागे समितीचा अहवाल कारणीभूत आहे. आता जे आंदोलन चिघळले त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, तसेच मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी नेमलेल्या समितीने यावर मत द्यावे. - पंकजा मुंडे, नेत्या, भाजप  

२०१४ मध्ये भाजपने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले व निवडणुकीत फायदा करून घेतला.  आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवावी व जातनिहाय जनगणना करावी. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण