शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ७ वर्षांनंतर होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

By विकास राऊत | Updated: August 24, 2023 12:26 IST

१५ वर्षांत दोन बैठका, मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७ वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रलंबित व नवीन योजनांच्या आढाव्यासह टंचाईसदृश परिस्थिती आणि मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष समाप्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७ वर्षांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. याबाबत शासनाकडून यासाठी तोंडी निराेप आला असून, आठवड्याच्या अखेरीस नियोजनाचे पत्र येणे अपेक्षित आहे.

४ ऑक्टोबर २०१६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात झाली होती. ५० हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम विभागासाठी आखण्यात आला होता. त्याचे काय झाले, किती प्रकल्प मार्गी लागले, अनुदान किती मिळाले, या सगळ्या बाबींची माहिती विभागीय आयुक्तालयाने पूर्ण विभागाकडून मागविण्यास सुरुवात केली आहे.

कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणीअभावी ‘कालबाह्य’ ठरल्याची टीका झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या सुमारे ५० हजार कोटींच्या कार्यक्रमांपैकी बहुतांश योजनांना गती मिळाली नाही. मराठवाड्यातील सिंचन अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून तत्कालीन सरकारने सुमारे दहा हजार कोटींसह रस्ते विकास, कृषी, पायाभूत सुविधांसह औद्योगीकरणास चालना देणाऱ्या योजना सात वर्षांत बाळसे धरू शकल्या नाहीत.

१५ वर्षांत झाल्या फक्त दोन बैठका...१५ वर्षांत मंत्रिमंडळाच्या फक्त दोन बैठका झाल्या. २००८ साली स्व. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. यानंतर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निम्न दुधना आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. परंतु इतर प्रकल्पांना तरतुदीच्या तुलनेत अत्यल्प निधी मिळाल्याने ती कामे अजूनही सुरूच आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणारराज्य मंत्रिमंडळ बैठकीबाबत तोंडी सूचना आल्या आहेत. लेखी सूचना येतीलच. विभागीय प्रशासनाने पूर्ण जिल्हा व विभागनिहाय प्रकल्प, योजनांची माहिती घेण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री १७ सप्टेंबर येणार आहेत.- मधुकरराजे आर्दड, विभागीय आयुक्त

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार