शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यात घुसून धडकी भरवणाऱ्या ‘राज’सभेने उभी केली शिवसेनेसमोर आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 13:35 IST

या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी होत आहे.

- स.सो. खंडाळकरशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून शिवसेनेला धडकी भरवणारी सभा असंच वर्णन ‘राज’सभेचं करावं लागेल. सभेमुळे निर्माण झालेलं वातावरण पलटवून लावण्याचं मोठं आव्हान स्थानिक शिवसेनेसमोर नक्कीच आहे.

ना नकला ... ना मिमिक्री.....पोलिसांनी १६ अटी लादल्याचा परिणाम राज ठाकरे यांच्या भाषणातून जाणवत होता. त्यामुळेच त्यांनी ना कुणाच्या नकला केल्या, ना कुणाचे आवाज काढले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येऊन राज ठाकरे यांनी ना शिवसेनेचे नाव घेतले, ना उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना मात्र त्यांनी ‘टार्गेट’ केले. त्यांच्यावर थेट जातीयवादचा आरोप करीत शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच ॲलर्जी असल्याचा शोध लावला. त्यांचं नास्तिक असणं राजना डाचतंय.

भोंगा की लाउडस्पीकर........ ?आक्रमकपणे मांडलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे लवकर येतच नव्हते. पब्लिकमधून कुणीतरी आवाज काढला...' भोंगा'. येतो त्या मुद्द्यावर असं राज यांना म्हणावं लागलं. सभेत राज यांनी भोंगा हा शब्द न वापरता लाउडस्पीकर हा शब्द वारंवार वापरला. हा बदल सहज लक्षात आला. पवार यांच्यावरील टीकेपेक्षा लोकांना भोंग्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. ते ऐकण्यासाठीच लोक सभेला आलेले होते. मग राज यांनी पवार यांना टार्गेट करायचं आणि एरव्ही खुलासे करण्याच्या भानगडीत न पडणारे पवार यांनी खुलासे करायचे, हे राजकारण अद्याप तरी महाराष्ट्रासाठी गूढच आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांशी तुलना.....या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी होत आहे. बाळासाहेबांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभाच शिवसेना मराठवाड्यात रुजण्यास कारणीभूत ठरल्या. बाळासाहेबांच्या सभांमध्ये आसनव्यवस्था नसायची. लोक उभे राहूनच सभा ऐकायचे. ‘राज’सभेत आसनव्यवस्था होती. तरीही बाहेर झालेली गर्दीही नक्कीच दखल घेण्यासारखी होती. तरुणाईचा उत्साह, जोष, जल्लोषही दिसला. शिवसेनेसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. राज यांच्या सभेतली गर्दी स्थानिक किती, बाहेरची किती हाही चर्चेचा विषय ठरू शकतो.

खैरे - दानवे यांच्यावर टीकास्त्रराज ठाकरे यांच्या आधीच्या वक्त्यांनी चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांना टार्गेट केले होते. सुमित खांबेकर, दिलीप धोत्रे यांनी खैरेंवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला खैरे- दानवे कसे उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ही सभा औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे शिवसेनेचे गणित बिघडवू शकते का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाMNSमनसे