शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीवेळी एकच उमेदवार अनेकदा धावला?; परीक्षा रद्दसाठी खंडपीठात याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:52 IST

पोलिस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलिस बलातील १८ हजार ३३१ जागांसाठी १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

-राम शिनगारे छत्रपती संभाजीनगर : पोलिस शिपाईपदाच्या  कागदपत्रांची तपासणी व मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांसाठी २ एप्रिल रोजी राज्यभरात (मुंबई शहर वगळून) लेखी परीक्षा होणार आहे.  यासाठी एकाच अर्जाची परवानगी असताना शेकडो उमेदवारांनी नियमाचा भंग करीत अनेक जिल्ह्यांत अर्ज करून मैदानी चाचणीत सहभाग नोंदवला. त्यामुळे नियोजित लेखी परीक्षा पुढे ढकलावी किंवा स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. राज्यात  पोलिस शिपाईपदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवाराला राज्यात एकाच ठिकाणी अर्ज दाखल करण्याची मुभा होती. मात्र, अनेक उमेदवारांनी विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले. त्यासाठी वेगवेगळे ई-मेल, मोबाइल नंबर वापरले. 

पोलिस भरतीसाठी कागदपत्रांच्या तपासणीसह मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी असल्यामुळे अनेक ठिकाणी अर्ज करणाऱ्यांना विविध ठिकाणी सहभागी होता आले. त्याचा परिणाम एकच उमेदवार अनेक जिल्ह्यात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरला. मात्र, हा उमेदवार एकाच ठिकाणी लेखी परीक्षा देऊ शकणार आहे.  त्याचा  फटका इतर उमेदवारांना बसला. एखादा गुण कमी पडलेले उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरले नाहीत. यामुळे २ एप्रिल रोजी होणारी लेखी परीक्षा स्थगित करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उमेदवार राहुल चव्हाण यांच्यासह इतरांनी ॲड. विनोद राठोड यांच्यामार्फत खंडपीठात सादर केली आहे.  

१८ लाख जणांनी भरले होते अर्ज

पोलिस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलिस बलातील १८ हजार ३३१ जागांसाठी १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पोलिस शिपाईपदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी १२ लाख २५ हजार ८९९ अर्ज, चालक पोलिसपदाच्या २ हजार १७४ जागांसाठी २ लाख १५ हजार १३२ आणि राज्य राखीव पोलिस दलातील १ हजार २०१ जागांसाठी ३ लाख ७१ हजार ५०७ जणांनी अर्ज केले होते.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद