शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार ‘आधे इधर, आधे उधर’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:32 IST

शिवसेनेचे दोन आमदार, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीच आहेत.

- स.सो. खंडाळकरऔरंगाबाद : जिल्ह्यात अपक्ष आमदार एकही नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर ते समाधानी असण्याचा वा नसण्याचा प्रश्नच नाही. महाआघाडीमधले शिवसेनेचे सहा, राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील दोन आमदार आहेत. कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. शिवाय विधान परिषदेवरही कॉंग्रेसचा कुणी आमदार नाही. भाजपचे तीन आमदार विरोधी पक्षात असल्याने ते महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

शिवसेनेचे दोन आमदार, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीच आहेत. पैठणचे संदीपान भुमरे हे रोहयो व फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, तर सिल्लोडचे अब्दुल सत्तार हे महसूल व ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांसह सहा खात्याचे मंत्री आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचीच चलती आहे. १) जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार? कॉंग्रेस : एकही नाहीराष्ट्रवादी : निवडून आलेला एकही नाही, शिक्षक व पदवीधर आमदार राष्ट्रवादीचे आहेत.शिवसेना : निवडून आलेले पाच आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेला एक आमदारभाजप : तीन आमदारअपक्ष : एकही नाही 

२) सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?

कॉंग्रेसचा एकही आमदार नाही.राष्ट्रवादी :सरकारच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. सरकार स्थापन होऊन काहीच दिवस झाले होते आणि कोरोनाची महामारी सुरू झाली. त्यामुळे सरकारला जनतेचे प्राण वाचवायला प्राधान्य द्यावे लागले. त्यामुळे इतर खात्यांचाही निधी तिकडे वळवावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने सरकार ज्या ज्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल, ते तसे दिले जाईल. सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहोत.- विक्रम काळे, शिक्षक आमदार, मराठवाडा विभाग

शिवसेनाथोड्याफार कुरबुरी असल्या तरी महाविकास आघाडी सरकारकडून आम्ही निधी मिळवायचा प्रयत्न करतो. नव्या आमदारांना निधी मिळताना अडचणी येतात. परंतु आम्ही निधी मिळवायचा प्रयत्न करतो. सध्या माझ्या औरंगाबाद प. मतदारसंघात सातशे ते आठशे कोटींची कामे सुरू आहेत. हे सरकार आल्यापासूनची ही कामे असून, त्यामुळे सरकारच्या कामगिरीवर नाराज असण्याचे कारण नाही.- संजय शिरसाट, आमदार, औरंगाबाद प. मतदारसंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र