शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

जलवाहिनीवरील रस्त्याचा वापर होणार नाही; मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न, पाणी कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:12 IST

नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर नॅशनल हायवेने चक्क रस्ता तयार केला. ‘लोकमत’ने चूक कुणाची, शिक्षा कुणाला? या अंतर्गत वृत्त मालिका प्रकाशित केली. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. जलवाहिनीवर रस्ता तयार केला असला, तरी वाहतुकीसाठी त्याचा वापर अजिबात करता येणार नाही. नॅशनल हायवेने रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी स्वतंत्रपणे भूसंपादन करावे, असा निर्णय घेण्यात आला. मार्चपूर्वी शहरात किमान ३५० एमएलडी पाणी येईल, असा विश्वास मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले. त्यावर १२ किमीपर्यंत नॅशनल हायवेने रस्ता तयार केला. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आक्षेप घेतला. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला. मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रस्त्याची पाहणीही केली.

मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न; पाणी कधी देणार?दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा आढावा घेतला. त्यांनी पहिला प्रश्न अधिकाऱ्यांना केला की, छत्रपती संभाजीनगरला पाणी कधी देणार? जलवाहिनीवर रस्ता तयार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जलवाहिनीचे काम थांबवू नका, असे निर्देश त्यांनी दिले. मार्चपूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. जलवाहिनीवर तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. जलवाहिनीच्या बाजूला लोखंडी बॅरिकेट्स राहतील. रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यासदेखील मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविली आहे.

दररोज ३५० एमएलडी पाणीनवीन पाणीपुरवठा योजनेत शहराला रोज २०० एमएलडी पाणी मिळेल. ९०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी आणि जुन्या १२०० मिमीच्या जलवाहिनीतून ८० एमएलडी पाणी मिळाले तर शहराला ३०० वर एमएलडी पाणी मिळेल. रोज पाणीपुरवठा होऊ शकेल. यंदा उन्हाळ्यात शहरवासीयांना अजिबात त्रास होणार नाही, असे प्रशासक म्हणाले.

नवीन जलकुंभांचा वापरमजीप्राने मनपाला काही जलकुंभ दिले. हनुमान टेकडी, हिमायतबाग, शिवाजी ग्राऊंड, टीव्ही सेंटर येथून पाणी देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना प्रेशरने पाणी मिळू लागले आहे. पाणीपुरवठ्याचे टप्पे कमी झाले. काही जलकुंभांवरील भार कमी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी