शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप

By विकास राऊत | Updated: April 25, 2025 17:51 IST

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रात्री वाळूच्या हायवांच्या दणदणाटाने सकाळपर्यंत रस्त्याचा फुपाटा उडतो, साडेपाच कोटींच्या रस्त्याचे काम ठप्प

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पैठण तालुक्यातील राज्य महामार्ग हनुमंतवाडी ते दादेगाव जहाँगीर (जुने) ते दादेगाव जहाँगीर (नवे) या साडेपाच कोटींतून होणाऱ्या ७ कि.मी. रस्त्याचे दिवसा डांबरीकरण करण्यात येते. मात्र, रात्रीतून वाळूने भरलेल्या हेवीलोड हायवांच्या वाहतुकीमुळे सकाळपर्यंत रस्त्यावर फुपाटा होत आहे.

कच्च्या रस्त्यावरून हायवाची वाहतूक होऊ नये, यासाठी ग्रामस्थ रोज रात्री १ वाजेपर्यंत पहारा देतात, परंतु त्यानंतर हायवांची वाहतूक सुरू होते, ती पहाटेपर्यंत चालते. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील शेतमाल व इतर दळणवळणासाठी हा एकमेव रस्ता असून, त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हाती घेण्यात आले. परंतु, त्यालाही वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे खीळ बसली आहे. परिणामी, कंत्राटदाराची टीम वैतागली असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पैठण पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पत्र दिले आहे. किमान रस्त्याचे काम होईपर्यंत तरी जडवाहतूक थांबल्यास रस्ता टिकेल. अन्यथा, रस्ता लवकर खराब होईल, असे रस्ते विकास संस्थेचे मत आहे.

अभियंत्यांचे पोलिसांना साकडेत्या रस्त्यावरून अवजड वाहतूक ही प्रति एक्सल ८ टन अशी आहे. मात्र, त्यावरून रात्रीतून चोरटी वाळू वाहतूक होत असल्याने रस्ता खचून फुटतो आहे. रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरणाचे काम सध्या सुरू असून, त्यावरून २३ रोजी मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणात हायवांची वाहतूक झाल्याने रस्त्याचा भुगा झाला. त्यामुळे वाळूची अवजड वाहतूक बंद करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तो रस्ता गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजेसाठी आहे, त्यावर जडवाहतूक होत राहिली तर तो जास्त दिवस टिकणार नाही, असे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अभियंत्यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

रस्त्याची तांत्रिक माहितीरस्त्याचे नाव : राज्य महामार्ग हनुमंतवाडी ते दादेगाव जहाँगीर (जुने-नवे)रस्त्याचा खर्च किती : ५ कोटी ५० लाखकिती कि.मी. रस्ता : ७ किलोमीटरगावची लोकसंख्या : ५ हजारकंत्राटदार कोण : एस. डी. दोंडेकार्यवाह यंत्रणा : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsandवाळू