छत्रपती संभाजीनगरवासीय दररोज ६ टन पोह्यांचा नास्ता करतात फस्त 

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 30, 2023 08:41 PM2023-06-30T20:41:23+5:302023-06-30T20:42:19+5:30

भाववाढ झाली; पण, नास्त्याचा भाव स्थिर; कांदेपोहे अजूनही खमंग रुचकर

The residents of Chhatrapati Sambhajinagar eat 6 tons of poha every day | छत्रपती संभाजीनगरवासीय दररोज ६ टन पोह्यांचा नास्ता करतात फस्त 

छत्रपती संभाजीनगरवासीय दररोज ६ टन पोह्यांचा नास्ता करतात फस्त 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीय दररोज नास्त्याला ६ टन खमंग पोहे खातात. महिन्याकाठी १८० टनपेक्षा अधिक पोह्याची शहरात विक्री होते. पोह्यांचा नास्ता एवढा लोकप्रिय आहे. सकाळच्या वेळी तर शहरातील अनेक चौकात पोह्यांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी उसळते. विशेष म्हणजे पोह्यांचे व मुरमुऱ्यांचे दर वाढले आहेत. मात्र, अजून पोहे विक्रेत्यांनी प्लेटचे भाव वाढविले नसल्याने कांदा पोहा ग्राहकांसाठी आणखी खमंग बनला आहे.

किरकोळ विक्रीत दर
प्रकार दर (प्रतिकिलो)
साधे पोहे : ४६ रु. - ४८ रु.
पातळ पोहा : ५६. रु - ६० रु.
दगडी पोहा : ४८ रु. - ५० रु.
मुरमुरे : ६६ रु. - ८० रु.

दिवाळीपर्यंत दर वाढतच राहणार
शहरात गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांतून पोहे आणले जातात. कच्चामाल (धान)चा तुटवडा जाणवत आहे. कारण, उन्हाळी पीक कमी आले आहे. यामुळे पोहे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी, तर मुरमुरे ३०० रुपयांनी महागले आहेत. किरकोळ विक्रीत पोहे व मुरमुरे किलोमागे ८ रुपयांपर्यंत वधारला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळीपर्यंत आणखी भाव वाढत राहतील.
- उमेश लड्डा, होलसेल व्यापारी

अजून खमंग पोह्याचे भाव स्थिर
पोह्यांचे भाव किलोमागे ८ ते १० रुपयांनी वाढले आहेत. पाच ते सहा महिन्यांपूर्वीच आम्ही खमंग पोह्याची प्लेट १० रुपयेऐवजी १५ रुपये केली होती. मात्र, भाववाढ होऊनही आम्ही भाव वाढविले नाही. कारण, विक्रेत्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. भाव वाढविले की, ग्राहक कमी होतात.
- मनोज कस्तुरे, भजे, पोहा विक्रेता

मुरमुऱ्यांची विक्री घटली
उन्हाळ्यात मुरमुऱ्यांची विक्री दररोज ३ ते ४ टनपर्यंत असते. मात्र, पावसाळा सुरू झाल्यावर मुरमुरे लूज पडतात. यामुळे या दिवसात मुरमुरे खाणाऱ्यांची संख्या कमी होते. सध्या दररोज १ ते दीड टन मुरमुरे विक्री होत आहेत.
- टिंकू खटोड, किराणा व्यापारी

भाववाढ झाली तरी डब्ब्यात पोहे द्यावे लागतात
प्लेटभर पोहे खाल्ल्याने पोट भरते. यामुळे मुलांना शाळेच्या डब्यात अधून-मधून खमंग पोहे देत असते. किलोमागे ८ ते १० रुपयांनी पोहे महागले. ठीक आहे, मुलांना पोहेच आवडतात.
-रश्मी सुराणा, गृहिणी

Web Title: The residents of Chhatrapati Sambhajinagar eat 6 tons of poha every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.