शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद 'अनुसूचित जमाती-महिला' प्रवर्गासाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 19:57 IST

सोयगाव नगरपंचायतच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळवून बहुमत मिळविले आहे.

सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यावेळी सोयगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती-महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे बहुमतात असलेल्या शिवसेनेकडून आशाबी अश्रफ तडवी  नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असतील. विशेष म्हणजे, या प्रवर्गासाठी बहुमतात असलेल्या शिवसेनेकडे एक आणि अल्पमतात असलेल्या भाजपाकडेही एक सदस्य आहे. 

सोयगाव नगरपंचायतच्या सभागृहात १७ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ११ जागांवर शिवसेनेने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवून बहुमत मिळविले आहे. तर दोन क्रमांकावर भाजप असून त्यांच्याकडे सहा जागा आहेत. या विजयानंतर सत्तार यांनी भाजपचे केंद्रातील मंत्री रावासाहेब दानवे आणि भागवत कराड या दोघांना आव्हान दिले आहे. बहुमत मिळाल्यानंतर नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते याची उत्सुकता होती. आज सायंकाळी राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी  नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सोयगाव नगराध्यक्ष पद अनुसूचित जमिती - महिला या प्रवर्गासाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आले.

शिवसेने कडे बहुमत असल्याने साहजिक त्यांचा उमेदवार येथे बाजी मारणार आहे. विशेष म्हणजे, भाजपाकडे देखील नगराध्यक्ष पदासाठी या राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे. मात्र, बहुमत नसल्याने नगराध्यक्ष पदासाठी त्यांना दावा करता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा आहे. यामुळे शिवसेनेच्या वॉर्ड क्र-१७ मधून निवडून आलेल्या आशाबी अश्रफ तडवी यांची नगराध्यक्ष पदी वर्णी जवळपास निश्चित झाली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAbdul Sattarअब्दुल सत्तार