शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी पाठलाग करत पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 17:03 IST

जामगाव येथे अंधारात एक किमी पाठलाग करून घेतले ताब्यात

- जयेश निरपळ

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर): देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंडसह वावणाऱ्या व अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या एका सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी तालुक्यातील जामगाव येथे कारखाना परिसरात मंगळवारी(१०)रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पाठलाग करून ताब्यात घेतले;महेश काशीनाथ काळे(२८)रा.जामगाव असे कट्टा बाळगणाऱ्या आरोपींचे नाव असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की गंगापूर पोलिस ठण्याचे पोनि सत्यजीत ताईतवाले हे जामगाव परिसरात गस्तीवर असताना त्यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की येथे सराईत गुन्हेगार महेश काळे कमरेला कट्टा लावून वावरत असून तो साखर कारखाना परिसरात दारू पिण्यासाठी जात आहे. त्या माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास साखर कारखाना परिसरात सापळा लावला. आरोपी महेश काळे त्या परिसरातून जात असताना पोलिसांनी त्याला हटकले. मात्र त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्यास कारखान्यासमोर असलेल्या जिप शाळेच्या मैदानात ताब्यातून  ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा, दोन जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत सफौ थोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश काशीनाथ काळे(२८)रा.जामगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई पोनि सत्यजीत ताईतवाले,सफौ दिनकर थोरे,पोकॉ अमोल कांबळे,अभिजित डहाळे,अतुल भवर,विजय नागरे,तेनसिंग राठोड,राहुल वडमारे यांच्या पथकाने पार पाडली 

अनेक गुन्ह्यात हवा होता आरोपीआरोपी महेश काळे हा सराईत गुन्हेगार असून सन २०१६ ते आतापर्यंत त्याच्यावर गंगापूरसह अहमदनगर,वाळूज,वीरगाव येथील पोलिस ठाण्यात एकूण १४ गुन्हे दाखल आहे यात प्राण घातक हल्ला करणे,चोरी,दरोडा,मारहाण,अवैध शस्त्र बाळगणे,विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांच्या समावेश असून पोलिस त्याच्या मागावर होते.अनेक गुन्ह्यात हवा असलेल्या आरोपी महेश काळेला गंगापूर पोलिसांनी जेरबंद केल्याने गंगापूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद