शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जुना वाद उफाळून आला; टोळक्याच्या चाकूहल्ल्यात तरुणाचा मृत्यू 

By राम शिनगारे | Updated: February 5, 2024 11:55 IST

भावसिंगपुऱ्यात तरुणाचा खून; छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून टोळक्याने तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी भावसिंगपुरा भागात घडली. याप्रकरणी छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर वाळूज पोलिसांनी तीन संशयितास ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

शेख आमेर शेख सलीम (२९, रा. जुना भावसिंगपुरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शेख आमेर याच्याविरोधात दारू विक्री, हाणामारीसह खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याचा जुन्या मित्रासोबत वाद होता. या वादातून मित्रांच्या टोळक्याने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आमेरला भावसिंगपुऱ्यात गाठले. त्याच्यासोबत जुन्या वादातून हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला.

हे समजताच पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक प्रमोद देवकते, गणेश केदार यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आमेरला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच आमेरचा मृत्यू झाला. दरम्यान, छावणी पोलिसांनी रात्री उशिरा एका तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तीन आरोपींना पकडलेयातील तीन आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पकडले आहे. त्यात रोहित नागेश मोठे (२५), ईश्वर राजेश चव्हाण (२३) आणि सचिन सर्जेराव त्रिभुवन (२३, तिघेही रा. भावसिंगपुरा) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक पांडुरंग डाके, अंमलदार गणेश सगरे, रोहित चिंडले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद