शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

ईद-मिलनचे निमित्त, प्रतिष्ठांच्या भेटीगाठी; औरंगाबादेत तिन्ही उमेदवारांचा मुस्लिम मतांवर डोळा!

By मुजीब देवणीकर | Updated: April 17, 2024 18:20 IST

लोकसभा निवडणुकीत शहरी भागातील मुस्लिम मतांची भूमिका यंदा निर्णायक ठरणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम, दलित मते निर्णायक ठरतात. मुस्लिम मते आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एमआयएम, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ईद-मिलनचे निमित्त साधून उमेदवार मुस्लिमबहुल भागातील प्रतिष्ठित मंडळींच्या भेठीगाठी घेत आहेत. विद्यमान खासदारांच्या पाठीशी दलित मते नसल्याचे लक्षात येताच महाविकास आघाडीने थेट मुस्लिम मतांना सुरुंग लावायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अद्याप महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. महाविकास आघाडी, वंचित आणि एमआयएमने उमेदवार घोषित केले. या उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून प्रचाराला प्रारंभही केला. मागील लोकसभा निवडणुकीत हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. मुस्लिम-दलित मते एमआयएमकडे गेली. त्यामुळे एमआयएमला विजय मिळाला. यंदा राजकीय समीकरणे बरीच बदलली आहेत. महायुती वगळता अन्य तिन्ही उमेदवार मुुस्लिम मते मिळविण्यासाठी सरसावल्याचे चित्र दिसू येत आहे.

याचे उदाहरण म्हणजे शहरातील मुस्लिमांची सर्वांत मोठी संघटना म्हणजे मुस्लिम नुमाईंदा कौन्सिल होय. दोन दिवसांपूर्वी कौन्सिलच्या अध्यक्षांना त्यांच्या घरी भेटायला महाविकास आघाडीचे उमेदवार दाखल झाले. ते बाहेर पडून दोन मिनिटे झालेले असतानाच वंचितचे उमेदवारही पोहोचले. याला कारण होते ईदनिमित्त सदिच्छा भेटीचे. एमआयएम पक्षानेही हक्काच्या मुस्लिम मतांचे विभाजन होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सुरुवात केली. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. यापूर्वी ओवेसी काही भागात पदयात्रा, एक जाहीर सभा करून निघून जात असत. यंदा त्यांनीही ४० अंश तापमानात घाम गाळायला सुरुवात केली.

शहरी भागातील मुस्लिम मतदानलोकसभा निवडणुकीत शहरी भागातील मुस्लिम मतांची भूमिका यंदा निर्णायक ठरणार आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष घातल्यास लक्षात येते की, जवळपास १ लाख ८७ हजारांहून मते एआयएमला मिळाली होती. याच निवडणुकीत वंचितला मध्य मतदारसंघात २७ हजार, पश्चिममध्ये २५ हजार मते पडली होती. पूर्वमध्ये एमआयएमला पाठिंबा दिला होता.

असे झाले होते मतदानविधानसभा----पक्ष- पडलेली मते------टक्केवारीपूर्व - ----एमआयएमला--- ८०, ०३६---४०.९७मध्य- एमआयएम- ------६८,३२५-----३५पिश्चित---एमआयएम---३९,३३६ -----१९.७१

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेImtiaz Jalilइम्तियाज जलील