शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वाकडे, १०० कोटींवर खर्च

By विजय सरवदे | Updated: May 23, 2024 19:14 IST

येत्या दोन महिन्यांत (जुलैमध्ये) विखुरलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली कार्यान्वित करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या पर्यावरणपूरक (ग्रीन बिल्डिंग) चार मजली प्रशासकीय इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत (जुलैमध्ये) विखुरलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली कार्यान्वित करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त केला. दरम्यान, कंत्राटदार कंपनीने त्यादृष्टीने खिडक्या, दरवाजे, टाईल्स, विद्युतीकरणाच्या कामाला गती दिली आहे. विशेष म्हणजे, ही इमारत पूर्णत्वास येईपर्यंत सुमारे शंभर कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

जिल्हा परिषदेची औरंगपुरा परिसरातील प्रशासकीय इमारत ही निजामकालीन वास्तूमध्ये होती. ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे सन २००१ पासून नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या इमारतीचा कोनशिला समारंभही झाला होता; पण कधी निधीच्या, तर कधी जागेच्या भोवऱ्यात अडकलेल्या इमारत उभारणीच्या कामाला मुहूर्तच लागला नव्हता. अखेर दोन दशकानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. आता २ वर्षे ८ महिने होत आले आहेत. या इमारतीसाठी सुरुवातीला ३७ कोटी व नंतर सुधारित ४७ कोटींचा निधी मिळाला. त्यातून प्लास्टर, एलिव्हेशन ट्रीटमेंट, परिसर सौंदर्यीकरण, आपत्कालीन अतिरिक्त जिना, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम केले जात आहे. आता फर्निचर, अग्निशामक व अग्निरोधक यंत्रणा व अन्य कामांसाठी आणखी १० कोटी रुपयांच्या सुधारित निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनाने प्रशासकीय मंजुरीही दिली आहे. आचारसंहिता शिथिल होताच हा निधीही प्राप्त होईल.

अशी असेल कार्यालयांची रचना- तळमजल्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार विषय समित्यांचे सभापती, प्राथमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम, समाजकल्याण, पेन्शन सेल आदी दालने, शिक्षण विभागाचे स्टोअर रुम.- पहिल्या मजल्यावर वित्त, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाणीपुरवठा आणि माध्यमिक शिक्षण विभाग.- दुसऱ्या मजल्यावर मुख्य कार्यकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन, सामान्य प्रशासन विभाग, व्हिडीओ काॅन्फरन्सिंग हॉल, पंचायत विभाग, महिला व बालविकास विभाग, सेंट्रल रेकॉर्ड रुम, सेमिनार हॉल.- तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन, कृषि, व्हीआयपी रुम, सर्वसाधारण सभेसाठी सभागृह, ग्रंथालय, एनएचआरएमचे कार्यालय असेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद