शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
6
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
7
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
8
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
9
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
10
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
11
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
12
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
13
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
14
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
15
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
16
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
17
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
18
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
19
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
20
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."

मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:50 IST

आवलगाव हमरापुर ग्रामपंचायतच्या खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी रामचंद्र मोरे यांचा विजय

- बाबासाहेब धुमाळवैजापूर ( औरंगाबाद) : तालुक्यातील आवलगाव हमरापुर ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. सर्व मातब्बर मंडळीच्या विरोधात मासेमारी करणारे कुटुंब असा सामना येथे रंगल्याने तालुक्याचे लक्ष या लढतीकडे होते. यामध्ये मासेमारी करणारे रामचंद्र मोरे गावचे सरपंचपदी विराजमान झाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

वैजापूर तालुक्यातील आवलगाव हमरापुर या ग्रुप ग्राम पंचायतीची निवडणूक चांगलीच रंगत वाढवणारी ठरली. हमरापुर येथील मोरे कुटुंब पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातूनच त्यांनी आपल्या कुटुंबाला उच्चशिक्षित केले. रामचंद्र मोरे यांच्या मुलगा देशसेवेमध्ये कार्यरत आहे. एक पुतण्या डॉक्टर, दुसरे पीएसआय झालेले आहेत. मागील पंच वार्षिक निवडणुकीत मोरे यांच्या सुनबाई नंदाबाई संजय मोरे ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या. त्यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे झाली. 

या पंचवार्षिकसाठी सरपंच पद खुलाप्रवर्गसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र, मासेमारी करता करता गावची विकासाची नाळ मोरे कुटुंबाकडे असल्याचा त्यांना फायदा झाला. त्यामुळेच खुल्याजागेत मातब्बरांच्या विरोधात रामचंद्र मोरे हे सरपंच पदासाठी निवडणुकीत उभे राहिले. प्रचारा दरम्यान यंदा जोरदार लढत पाहायला मिळेल याचा अंदाज सर्वांनाच आला. दोन्ही गावातील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत निवडून दिले. मोरे यांना ४६५ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील सोमनाथ पाटील यांना ३६४ मते मिळाली. मासेमारी करणारा गावचा कारभारी बनल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, आमचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय सुरु राहील. यासोबतच गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच मोरे यांनी विजयानंतर सांगितले.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच