शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाव ‘चिमण्या’ पण कामगिरी दमदार; शंकरपटाचा हिंद केसरीचा मानकरी अन् किंमत ६४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:52 IST

‘चिमण्या’ बैलास अंडी, बदाम, १० लिटर दूधाचा खुराक; किंमत तब्बल ६४ लाख; पुण्याच्या शौकिनाची फुलंब्रीतील तळेगाव वाडीच्या शेतकऱ्याकडून खरेदी

- रऊफ शेखफुलंब्री : तालुक्यातील तळेगाव वाडी येथील चिमण्या बैलाची तब्बल ६४ लाख रुपयांत विक्री झाली आहे. बैलगाडा मालक नवाब खाँ यांच्या एका बैलासाठी पुण्याच्या अमित भाडळे या शौकीन व्यक्तीने ही किंमत मोजली आहे. पुण्यातील कासेगावमध्ये झालेल्या शंकरपट स्पर्धेत चिमण्या हिंद केसरीचा मानकरी ठरला होता. याशिवाय, १७ स्पर्धांत त्याने प्रथम पारितोषिक मिळवून दिले आहे.

हौसेला मोल नाही, असे आपण नेहमीच म्हणतो. याची प्रचिती तळेगाव वाडीतील शंकरपटाच्या एका बैलासाठी पुण्याच्या शौकिनाने मोजलेल्या किमतीवरून येते. जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बैलगाडा मालकाला एका बैलासाठी ६४ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. तळेगाव वाडी येथील नवाब खाँ मजीद खाँ हे मागील काही वर्षांपासून शंकर पट स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्याकडे दोन वर्षांपासून चिमण्या नावाचा बैल आहे. त्याने राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील बैलगाडा शर्यतींमध्ये भाग घेत आतापर्यंत १७ प्रथम, तर ६ द्वितीय पुरस्कार पटकावले आहेत. चिमण्याची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली असून, पुणे येथील कासेगावातील शंकरपटात दिला जाणारा मानाचा हिंद केसरी पुरस्कारही त्याने पटकावला आहे.

दररोजचे खाद्य अंडी, बदाम, १० लिटर दूधयाबाबत चिमण्याचे मालक नवाब खाँ मजीद खाँ म्हणाले, आमच्याकडे शंकर पटाचे तीन बैल आहेत. त्यापैकी एक चिमण्या बैल विकला. त्याला ६४ लाख रुपये किंमत मिळाली. चार वर्षांपासून त्यांना दररोज १० लिटर दूध, अंडे, बदाम, उडीद डाळ, शाळू ज्वारीचा कडबा, हिरवा चारा असा आहार देत होतो. या खाद्यामुळे तो तंदुरुस्त आहे. शंकरपटाच्या अनेक शर्यती जिंकून दिल्याचे ते म्हणाले.

‘राजा-सम्राट’साठी एक कोटीची बोलीनवाब खाँ यांच्याकडे आणखी एक बैलजोडी आहे. राजा-सम्राट अशी त्यांची नावे आहेत. या जोडीने गेल्या एका वर्षभरात सहा ठिकाणच्या सहा शंकरपट शर्यतींमध्ये प्रथम पुरस्कार पटकावले. या जोडीसाठी एका हौशी व्यक्तीने एक कोटी रुपयांची बोली लागलेली आहे; पण नवाब खान यांनाही शंकरपटाचा छंद असल्याने राजा-सम्राट विकण्यास नकार दिला.

नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यतशंकरपट शर्यतीची आवड असल्याने हौसेपोटी चिमण्या बैलासाठी ६४ लाख रुपयांची किंमत मोजली. आठ दिवसांपूर्वीच चिमण्याचे मालक नवाब खाँ यांच्याकडून त्याला घेतले, असे पुण्यातील खरेदीदार अमित भाडळे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर