शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

बायपासला जोडण्यासाठी महापालिकेचा प्लॅन, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत उड्डाणपूल उभारणार

By मुजीब देवणीकर | Updated: January 28, 2023 20:37 IST

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा विषय मार्गी लागेना तरी...

औरंगाबाद : बीड बायपासकडे जाण्यासाठी संग्रामनगर हा एकच उड्डाणपूल आहे. बायपासच्या पलीकडे नागरी वसाहतींचा झपाट्याने विकास होतोय. नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची तयारी मनपा प्रशासनाने दर्शविली आहे. पुलासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केली.

बीड बायपासकडे जाण्यासाठी रेल्वेस्टेशन, संग्रामनगर, शिवाजीनगर हे तीन मुख्य रस्ते आहेत. रेल्वेस्टेशन एमआयडीसीमधूनही १०० फुटांचा एक रस्ता बायपासला येऊन मिळताे. मात्र, एमआयडीसी भागात रेल्वे रूळ गेल्याने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. या ठिकाणी एक उड्डाणपूल उभारला तर देवगिरी महाविद्यालयापासून नागरिकांना थेट बायपासला सहजपणे येता येईल. विशेष बाब म्हणजे दोन्ही बाजूने गुळगुळीत रस्ताही केला आहे. फक्त रेल्वे रुळावरून पूल बांधल्यास नागरिकांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी दोन्ही बाजूंनी उंच टेकड्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात याठिकाणी पूल होऊ शकतो, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अलीकडेच जागेची पाहणी केली. शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपअभियंता संजय कोंबडे यांची यावेळी उपस्थिती होती. यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याचे आदेश डॉ. चौधरी यांनी दिले.

भुयारी मार्ग केव्हा करणार?शिवाजीनगर येथील रेल्वेचा भुयारी मार्ग रखडल्याने सध्या नागरिकांना रेल्वेस्टेशन व संग्रामनगर हे दोनच उड्डाणपूल उपलब्ध आहेत. संग्रामनगर उड्डाणपुलालगत असलेल्या मैदानावर मोठा कार्यक्रम असल्यास रेल्वेस्टेशन उड्डाणपूल व शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांच्या रांगा लागतात. त्यात वाहनधारक अडकून पडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरात नवा उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. मनपाने शिवाजीनगर भूसंपादनाचा मार्ग माेकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका