शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

विभागीय क्रीडा संकुलाचा कोट्यवधीचा घोटाळा; मुलासह क्षीरसागर कुटुंबाचाच नियोजित कटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 19:29 IST

भांडाफोड होण्याची कुणकुण लागताच नाशिकमधून तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज, सर्वांचा विदेशात पळून जाण्याचा होता कट

छत्रपती संभाजीनगर: विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीत घोटाळा करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरला कोट्यवधींचा निधी लंपास करणे सहज सोपे वाटले. हा प्रकार कोणाला कळणार नाही याच भ्रमात त्याचे आई-वडीलही राहिले आणि पुढे कुटुंबाने सुनियोजित कट रचून सहा महिन्यांत २१.५९ कोटींचा निधी लंपास केला. मुलगा चुकतोय, हे माहीत असतानाही पैसे, उच्चभ्रू राहणीमानाच्या लालसेतून आई-वडिलांसह सख्ख्या मामानेही त्याला घोटाळ्यासाठी मूकसंमतीच दिल्याचे समोर येत आहे.

मंगळवारी हर्षकुमारचे आई-वडील अनिल व मनीषाला कर्नाटकमधील मुर्डेश्वर येथून अटक केली, तर हर्षकुमारला दिल्ली येथून अटक केली. उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाने दोघांसह हर्षकुमारचा मामा हितेश आनंदा शार्दूल (३५, मालेगाव कँप, नाशिक) याला देखील बुधवारी अटक केली. तिघांना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर तिघांना देखील ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सलग दुसऱ्या दिवशी सरकारी पक्ष, आरोपी वकिलांमध्ये तासभर खडाजंगी- सरकारी पक्षातर्फे ॲड. रवींद्र अवसरमल तर हर्षकुमार व कुटुंबीयांच्या वतीने ॲड. रामेश्वर तोतला यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.- बुधवारी हर्षकुमारच्या अटकेसंदर्भात झालेली दोन्ही पक्षांच्या वकिलांमधील खडाजंगी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी देखील पाहायला मिळाली.- पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजता मनीषा, अनिलला अटक केली. न्यायालयात मात्र गुरुवारी हजर केल्याचा दावा करत तोतला यांनी पोलिसांनी कायदाच मोडल्याचा मुद्दा मांडत पोलिसांवर कारवाईची मागणी केली.- जवळपास तासभर चाललेल्या या खडाजंगीनंतर न्यायालयाने पोलिसांना अटकेसंदर्भातील सर्व कागदपत्र, नोटीस सादर करण्याचे आदेश दिले.- पोलिसांनी मुर्डेश्वर येथील स्थानिक ठाण्यात पत्र देऊन ताब्यात घेतल्याचे, अटकेचे सर्व कागदपत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी पक्षाची कारवाई व न्यायालयीन कोठडीची मागणी फेटाळून लावली.

आईसह मामाच्या खात्यातही लाखो रुपयेऑक्टोबर महिन्यात हर्षकुमारने आईच्या बँक खात्यात ४७ लाख, मालेगावमध्ये सुतार काम करणाऱ्या मामाच्या खात्यावर २२ लाख रुपये पाठवले. शहर सोडल्यानंतर पुढे कसे पळून जायचे, कायदेशीर सल्लामसलत कशी करायची, त्याचे नियोजन देखील मामाच्या शेवटच्या भेटीत झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.

आई-वडिलांच्या पासपोर्टसाठी प्रयत्नसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोट्यवधी रुपये हडप केल्याच्या भ्रमात हर्षकुमार बेधुंद होता. त्यानंतर ऑडिटमध्ये निधीत तफावत आल्याने कार्यालयात याची चर्चा सुरू झाली. वरिष्ठ पातळीपर्यंत सल्लामसलत सुरू झाल्याचे हर्षकुमारला कळाले होते. आता आपला भांडाफोड होणार याची कुणकुण लागल्याने त्याने आई-वडिलांच्या पासपोर्टसाठी नाशिक कार्यालयात ‘तत्काळ’मध्ये अर्ज केला. यात सामान्य प्रक्रियेपेक्षा जलद गतीने पासपोर्ट मिळतो. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पोलिसांकडे याप्रकरणी अर्ज दाखल झाला आणि क्षीरसागर कुटुंबाचा विदेशात पळून जाण्याचा कट अपयशी ठरला.

४२ लाखांचे हिरे जडीत आठ चष्मे, ओम ऑप्टिकलकडून जबाब पूर्णप्रकरणाच्या प्राथमिक तपासात हर्षकुमारने ओम ऑप्टिकलमधून हिरे जडीत चष्मा घेतल्याचे समोर आले होते. मात्र, त्याने केवळ एकच नाही, तर हिरेजडित, गोल्ड कोटेड असलेले ४२ लाख रुपयांचे चष्मे खरेदी केले होते. यातील काही रक्कम ऑनलाइन, तर काही रोख दिली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ओम ऑप्टिकलच्या संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजी