शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाष्टा आणतो सांगून प्रियकर खुनाचा प्लॅन करून आला; प्रेयसीचे शीर, हात लपवले गोडाऊनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:23 IST

प्रेयसीची क्रूर हत्या प्रकरण : दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद : प्रेयसीची हत्या केल्यानंतर धडावेगळे केलेले मुंडके, हात घेऊन प्रियकर सौरभ लाखे याने स्वत:च्या फर्निचर दुकानाच्या गोडाऊनमध्ये लपवून ठेवले होते. याच गोडाऊनमध्ये त्याने मृत अंकिताला १४ ऑगस्टच्या रात्री ठेवले होते. तेथूनच मित्रासोबत गाडीत घेऊन औरंगाबादेत आल्यानंतर तिची गळा दाबून १५ ऑगस्टच्या सकाळी हत्या केली होती. सिडको पोलिसांनी अटक केलेल्या दोन आराेपींना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

सौरभ बंडू लाखे (रा. शिऊर) याचे अंकिता श्रीवास्तव हिच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. दोघांची घरे शेजारीच असल्यामुळे दोन्ही कुटुंबांसह संपूर्ण गावालाच दोघांच्या संबंधांची माहिती होती. यातूनच अंकिताने नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. तिला सौरभने औरंगाबादेतील नवजीवन कॉलनीत भाड्याने खोली घेऊन दिली होती. दोन महिन्यांपासून अंकिता तेथे होती. सौरभ गावाकडून नियमितपणे येत होता. अंकितास अशा पद्धतीने राहणे मान्य नव्हते. तिने सौरभकडे लग्नाचा तगादा लावला होता. १४ ऑगस्ट रोजी ती शिऊरला गेली होती. त्या रात्री सौरभने तिला स्वत:च्या फर्निचरच्या गोडाऊनमध्ये ठेवले. तेथूनच पहाटे साडेचार वाजता सौरभ याने मित्राला गाडीसह बोलावून घेत तिघेजण औरंगाबादला आले. अंकिताला खोलीवर सोडल्यानंतर ती सौरभला जाऊ देत नव्हती. यापुढे मी तुझ्यासोबतच राहीन, असा हट्टही तिने धरला होता. तेव्हा सौरभने बाहेर जाऊन नाष्टा घेऊन येतो, असे सांगितले. 

मित्रासोबत तो बाहेर गेल्यानंतर खून करण्याची योजना बनवूनच परतला. त्याने मित्राच्या मदतीने अंकिताचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस चौकशीत मान्य केले. त्याच दिवशी त्याने रात्री उशिरा अंकिताचा मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचालकाने त्यास नकार दिल्यामुळे पुन्हा मृतदेह खोलीत ठेवला. १६ ऑगस्ट रोजी दुचाकीवर येत हत्याराने अंकिताचे मुंडके, हात कापून नेत तिला १४ ऑगस्टच्या रात्री ठेवलेल्या गोडाऊनमध्ये अवयव लपवून ठेवले. त्याठिकाणी तपास अधिकारी निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या पथकाने मध्यरात्री आरोपींना अटक केल्यानंतर नेले. सौरभने लपवून ठेवलेले मुंडके आणि हात दाखवले. पोलिसांनी ते जप्त करीत घाटी रुग्णालयात दाखल केले.

आरोपींची संख्या वाढणारसिडको पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ लाखे याच्यासह गाडीतून मृतदेह घेऊन जाण्यास मदत करणारा त्याचा मित्र सुनील गंगाधर धनेश्वर या दोघांना अटक केली आहे. याशिवाय मन्वर उस्मान शहा (रा. शिऊर) हा फरार आहे. अटक आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले. गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी, फरार मित्राला अटक करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली. न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली.

अंकितावर घेत होता संशयअंकिता नवऱ्यापासून विभक्त होत सौरभसाठी औरंगाबादेत येऊन राहत होती. मात्र, तिचे तिसऱ्यासोबतच सूत जुळल्याचा संशय सौरभला होता. त्यातूनही त्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. दोघांच्या कॉल डिटेल्समधून या बाबींचा उलगडा होणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद