शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ठप्प होता, कारण कळताच अंबादास दानवे थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 14:23 IST

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते थेट शेतकरी आंदोलनात सामील झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

गंगापूर ( औरंगाबाद ): अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांचे आज वैजापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू होते. यामुळे महार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.  दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मार्गावरून जात होते. त्यांना आंदोलनाची माहिती मिळताच ते देखील शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले. मागण्या जाणून घेऊन त्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले. 

जुलै -ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील मांजरी महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु. नुकसाभरपाईची देण्यात यावी व इतर प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी मांजरी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी ११ वा. वाल्मीक सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर मार्गावर रास्ता रोको सुरू केला होता. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत होते, नेते मनोगत व्यक्त करत होते. यावेळी दोन्ही बाजूने मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या मार्गावरून वैजापूर येथे माजी आमदार आर.एम.वाणी यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. महामार्ग ठप्प असल्याने त्यांनी माहिती घेतली. कारण कळताच दानवे गाडीतून उतरून थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील झाले. 

शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेत विधान परिषदेत मांडू, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दानवे यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर दानवे पुढे रवाना झाले. मात्र, रत्यावर सुरू असलेल्या आंदोलनात थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतच सामील झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. आंदोलनामुळे येवला करमाड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. 

टॅग्स :FarmerशेतकरीAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद