शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोकरा घोटाळ्याची चौकशी पंधरा दिवसांची मुदत संपल्यानंतरही सुरूच

By बापू सोळुंके | Updated: August 22, 2023 19:49 IST

या योजनेत गतवर्षी मधुमक्षिका पालन आणि शेततळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते.

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेची (पोकरा) अंमलबजावणी करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून गैरव्यवहार करण्यात आल्याचे कळताच 'पोकराला पोखरलं' ही वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली होती. कृषी विभागाच्या आदेशाने या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी २ ऑगस्ट रोजी नियुक्त समितीला पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र ही मुदत संपल्यानंतरही चौकशी पूर्ण झालेली नाही.

या योजनेत गतवर्षी मधुमक्षिका पालन आणि शेततळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते. केवळ कागदोपत्री मधुमक्षिका पेट्या आणल्याचे दाखवून बोगस बिले सादर करण्यात आली होती. या घोटाळ्याचाच भाग बनलेल्या कृषीच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर थातूरमातूर चौकशी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू होता. ही बाब समजताच लोकमतने याविषयी वृत्तमालिका प्रकाशित केली. विभागीय कृषी सहसंचालक रमेश जाधव यांनी २ ऑगस्ट रोजी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी आढाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. पण, पंधरा दिवस उलटल्यानंतरही चौकशी पूर्ण झाली नाही.

भाड्याने आणल्या मधुमक्षिका पेट्यासूत्रांनी सांगितले की, चौकशी समिती येणार असल्याचे कळताच शेतकऱ्यांनी एका टेम्पोतून मधुमक्षिकांच्या पेट्या ८ हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे भाडेतत्त्वावर शेतात आणून ठेवल्या आहेत. चौकशी होताच दुसऱ्या दिवशी या पेट्या संबंधित पेट्यामालक दुसऱ्या शेतात घेऊन जातात.

आणखी कर्मचारी दिले या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय वेगवेगळ्या गावांतील लाभार्थी असल्याने त्यांच्या शेतात जाऊन पडताळणी करण्यासाठी वेळ लागतो. मधुमक्षिका पालन, ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना आणि शेततळे इ. बाबींची तपासणी एकाच पथकाला शक्य नसल्याने त्यांच्या मदतीला गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील आणखी काही अधिकारी, कर्मचारी देण्यात आले आहेत.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी