शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

घर बंद होते अन् ड्रायव्हिंग लायसन्स परत गेले; तर काय कराल? 

By साहेबराव हिवराळे | Updated: October 27, 2023 17:45 IST

एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सध्या वाहन चालवायचा परवाना (लायसन्स) पोस्टात बुकिंग करूनच पाठविले जाते. सप्टेंबर महिन्यात आर्टिकल बुकिंगची सुविधा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई अशा तीन ठिकाणी सुरू झाली. या तीन ठिकाणांना राज्यातील इतर १४ आरटीओ कार्यालय कनेक्ट आहेत. येथून निघणारे परवाने ४ लाख ७२ हजार होते, ते संबंधितांना पाठविण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती या परवान्यासाठी तेवढीच अलर्ट असते, परंतु एखाद्याच्या घराचे दार बंद असल्यास ते परवाना पाकीट पोस्ट कार्यालयात सात दिवसांसाठी राखून ठेवले जाते.

आर्टिकल बुक केल्यापासून ते संबंधितांच्या घरी पोहोचेपर्यंत संदेश रजिस्टर केलेल्या मोबाइलवर येत असतो, पण तरीही एखाद्याचे घर यदाकदाचित बंद होते, म्हणून आर्टिकल परत जाते, पण अशा घटना किरकोळच आहेत. अनेक जण जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन त्वरित लायसन्सविषयी विचारपूस करून खात्री करून ते पोस्टाने आलेले लायसन्स मिळविण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा मोबाइल नंबर लायसन्सला लिंक केलेला नसेल, तर त्यांना संदेश मिळत नाही. अशा तुरळक नागरिकांना लायसन्स परत गेल्याने पुन्हा परवाना मिळविण्यासाठी धावपळ करावीच लागते.

नंतर सातच दिवस राहते पोस्टातआर्टिकल बुक झाल्यापासून पोस्टमन ते लायसन्स घरी आणून देईपर्यंत मोबाइलवर संदेश येणे सुरूच असते. घर बंद असल्यास संबंधितांचे लायसन्स त्याला मिळावे, त्याची गैरसोय होऊ नये, म्हणून पोस्टात सात दिवस ठेवले जाते. कुणी आलेच नाही, तर ते आर्टिकल पर संबंधित आरटीओ कार्यालयाला परत पाठविले जाते.

लायसन्स परत गेले, तर काय कराल?एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे. तेथे लायसन्स मिळू शकते, परंतु त्यानंतरही ‘तो पत्ता सापडला नाही’ असा शेरा पाकिटावर मारला जातो. आरटीओ कार्यालयास जमा करावे लागते. तेथे जाऊनही चौकशी करून कागदपत्र दाखवून ते पाकीट- आर्टिकल आरटीओ विभागाच्या संबंधित खिडकीतून मिळविता येते.

आपला मोबाइल लिंक करा...आपल्या वापरात असलेला माेबाइल नंबर, आधार, तसेच इतर गरज असलेल्या डॉक्युमेंटला जोडण्याची आवश्यकता आहे. कारण काही अडचणी येऊ नयेत, संदेशातून माहिती मिळत राहणे, अलर्ट मिळत राहणे सोयीचे होते, गैरसोय होत नाही.- देवेंद्र परदेशी, उपसचिव, महाराष्ट्र गोवा सर्कल एनएफपीई.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिसRto officeआरटीओ ऑफीस