शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

किरायाने दिलेल्या खोलीत मिठात पुरलेला मृतदेह आढळल्याने घरमालकाची बोबडीच वळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:48 IST

किचन ओट्याखाली खोदकाम करून तो सिमेंट-वाळूने बंद केलेला, तसेच त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड व लिंबू ठेवलेले दिसून आले.

वाळूज महानगर (औरंगाबाद) : वाळूजला तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात बुधवारी सायंकाळी मिठात पुरलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.

वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर असून यात तळमजल्यात ७ तर वरच्या मजल्यात ३ रूम बांधलेल्या आहेत. ७ महिन्यांपूर्वी शेळके यांनी काकासाहेब भुईगड (रा. धानोरा, ता. फुलंब्री) यांना तळमजल्यात दोन खोल्या किरायाने दिल्या होत्या. भुईगड हे पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास होते. नवरात्रात भुईगड यांनी शेळके यांना धानोरा येथे चाललो असल्याचे सांगितले होते. यानंतर भुईगड कुटुंबासह निघून गेले. दरम्यानच्या कालावधीत भुईगड यांच्याकडे एक महिन्याचे भाडे थकीत असल्याने शेळके हे मोबाइलवर अधूनमधून पैसे मागत होते. थकीत भाडे लवकरच आणून देण्याचे आश्वासन भुईगड देत होते.

घराच्या किचनमध्ये मिठात पुरलेला मृतदेह सापडलाशेळके यांनी बुधवारी भुईगड यांना फोन केला. मात्र, भुईगडचा मोबाइल बंद असल्याने, तसेच भाडे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेळके यांनी सकाळी भुईगड यांच्या खोल्यांचे कुलूप तोडले. शेळके यांना घरातील गृहपयोगी साहित्य गायब असल्याचे दिसले. किचन ओट्याखाली खोदकाम करून तो सिमेंट-वाळूने बंद केलेला, तसेच त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड व लिंबू ठेवलेले दिसून आले. शेळके यांनी खोदकाम सुरू केले. एका चादरीत मिठात गुंडाळलेला कुजलेला मृतदेह दिसल्याने शेळके यांची बोबडीच वळली. ही माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहा. आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक सचिन इंगोले, सहा.फौजदार सखाराम दिलवाले, पोकॉ. गणेश लक्कस आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मृतदेह महिलेचा की पुरुषाचा, हेही गूढच आहे.

किरायादाराच्या शोधासाठी पथक रवानापोलिसांनी भुईगडवर संशय व्यक्त केला. कुटुंबासह फरार असलेल्या भुईगडच्या शोधासाठी वाळूज पोलिस ठाण्याचे पथक त्याच्या मूळ गावी रवाना करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी