शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात मनपाच्या मौनामुळे वाढला होर्डिंगचा 'उद्योग'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:35 IST

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असताना त्यांनी विद्रुपीकरणावर बोट ठेवले. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून होर्डिंग काढण्याची प्रक्रिया वॉर्ड कार्यालयांकडून सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरात विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संस्था आणि संघटना मनात येईल, त्या ठिकाणी होर्डिंग लावतात. हे विद्रुपीकरण महापालिका प्रशासन अनेक वर्षांपासून उघड्या डोळ्याने पाहत आले. त्यामुळे अल्पावधीत होर्डिंग उद्योग भरभराटीस आला. या व्यवसायात कमालीची स्पर्धा सुरू झाल्याने दर गडगडले. हजार दीड हजार रुपयांमध्ये भव्य होर्डिंग तयार करून मिळू लागले. होर्डिंगसंदर्भात प्रशासनाने धोरणच निश्चित केले नाही, हे विशेष.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असताना त्यांनी विद्रुपीकरणावर बोट ठेवले. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारपासून कारवाईसुद्धा सुरू करण्यात आली. सर्व वॉर्ड कार्यालयांनी जिथे होर्डिंग दिसेल तेथील होर्डिंग जप्त करायला सुरुवात केली. काही ठिकाणी मनपा अधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या वादही झाले. सरसकट होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू झाल्याने राजकीय नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई किमान दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. शहरात किमान दहा हजार लहान-मोठे होर्डिंग असतील, असा अंदाज मनपा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

पुन्हा होर्डिंग लागू नये म्हणून काय?महापालिकेची यंत्रणा लावून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात येत आहेत. भविष्यात पुन्हा अशा पद्धतीने होर्डिंग लागणार नाहीत, यासाठी मनपाने कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. मनपा वर्षातून एकदा अनधिकृत होर्डिंग काढते. होर्डिंग लावणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जात नाही, त्यामुळे होर्डिंगचे पेव फुटले आहे.

जबाबदारी निश्चित करावी लागेलशहराच्या प्रत्येक भागात महापालिकेचे वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी ये-जा करीत असतात. बहुतांश कर्मचारी होर्डिंगशी आपला काय संबंध म्हणून निघून जातात. वॉर्ड स्तरावर जबाबदारी निश्चित केली तर पुन्हा होर्डिंग लागणार नाहीत.

मोठा दंड हवाअनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांना शोधून दंड आकारला पाहिजे. दंडाची रक्कम मोठी असल्यास स्वत: प्रसिद्धी मिळविणाऱ्यांना चाप बसू शकतो.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका