शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या सभेला विरोध करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:13 IST

याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवत याचिकाकर्त्यास १ लाखांची कॉस्ट सुनावली

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी याचिका औरंगाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली आहे. यासोबतच याचिकाकर्ते रिपब्लिकन युवा आघाडीचे जयकिसन कांबळे यांना कोर्टाने १ लाख रुपयांची कॉस्ट लावली. यामुळे आता सभेसाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत.

१ मे रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. 'मशिदीवरील भोंगे हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर केलेल्या घोषणेपासूनच सभेच्या विरोधात आणि समर्थनात वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पोलिसांनी ग्राउंड रिपोर्ट घेऊन अटीसह सभेला परवानगी दिली. मात्र, सभेला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी,अशी याचिका आज औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. 

खंडपीठाने याचिका फेटाळत राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच याचिकाकर्त्यास १ लाख रूपयांची कॉस्ट लावली. कॉस्टची रक्कम तीन दिवसात भरण्याचा आदेश कोर्टाने दिला. 

या अटींसह होणार 'राजसभा' जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, या सह १६ अटी पोलिसांनी सभेला परवानगी देताना घातल्या आहेत. पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ