शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:42 IST

घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी काढली आणि दुर्घटना झाली.

औरंगाबाद: बिडीचे व्यसन ८१ वर्षिय वृद्धाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच समेार आली.  निमखेड(ता. फुलंब्री) येथे १ मार्च रोजी बीडी पेटविताना गळ्यातील रूमालाने पेट घेतल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

रंगनाथ लिंबाजी जिवरग असे मृताचे नाव आहे. रंगनाथ यांना बिडी चे व्यसन होते. १ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते निमगाव येथील त्यांच्या घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी ओढली. बिडी पेटविताना त्यांच्या गळ्यातील रूमालाने पेट घेतला. गळ्यातील रूमालाची आग कशी विझविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.

मात्र, रूमालासह शरिरावरील अन्य कपडेही पेटल्याने त्यांचे हात, गळा आणि पाठीला चांगलेच जळाले. यानंतर त्यांना त्यांचा मुलगा नारायण रंगनाथ जिवरग यांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक मोरे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू