शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

‘भांगडा ते मुंगळा’ गाण्यावरच वऱ्हाडीचा ‘झिंगाट’ डान्स; ‘नागीण’ नृत्याशिवाय वरात पुढे जातच नाही

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 7, 2024 16:50 IST

लग्नाची गोष्ट : एरव्ही कधी न नृत्य करणारे ‘वराती’मध्ये थिरकतात...

छत्रपती संभाजीनगर :लग्नात सर्वांत आकर्षण असते ते ‘वराती’चे सजविलेल्या घोड्यावर बसलेला नवरदेव... समोरील बाजूस बँडपथकाच्या गाण्यावर नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करणारे वऱ्हाडी... कितीही नवीन गाणे सुपरहिट होत असले तरी वरातीमध्ये ‘भांगडा ते मुंगळा’ हे गाणे वाजविल्यावरच सर्वजण ‘झिंगाट’ डान्स करतात... एरव्ही कधी न नृत्य करणारे ‘वराती’मध्ये थिरकतात... जेव्हा एक मित्र तोंडात रुमाल घेऊन पिपाणी वाजविण्याची ॲक्शन करतो व दुसरा नागीण बनून रस्त्यावर लोळतो, तेव्हा वरातीतील आनंद शिगेला जाऊन पोहोचतो... या नागीण डान्सशिवाय वरात पुढे जातच नाही...!

वरील वर्णन ऐकल्यावर सर्वांना आपल्या व इतर नातेवाईक, मित्रांच्या लग्नातील ‘वरात’ आठवली असेलच...दरवर्षी बॉलिवूडमध्ये शेकडो नवीन गाणी तयार होतात. यांतील काही गाणीच लोकप्रिय ठरतात. बाकीची विस्मरणात जातात. मात्र, बॉलिवूडमधील काही अविस्मरणीय गाणी आहेत, ती पिढ्यान्पिढ्या लग्नाच्या ‘वराती’मध्ये वाजविली जात आहेत. नव्हे, त्या गाण्यांशिवाय वरातीमध्ये रंग भरतच नाही.

मेरे देश की धरती, मेरे यार की शादीबँड पथकातील कलाकारांनी सांगितले की, गणपतीच्या आरती वाजवतो आणि नंतर वरातीला सुरुवात होते. एक देशभक्तिपर गीत वाजविण्याची प्रथा आहे. त्यानुसार ‘मेरे देश की धरती’ हे गीत असतेच. त्यानंतर ‘मेरे यार की शादी है’ हे गाणे वाजवावेच लागते. त्यानंतर फर्माईशीनुसार गाणे वाजविले जाते; पण यात ‘मुंगळा’ गाणे वाजविल्याशिवाय रंगत येतच नाही. ‘नागीण’ गाण्यावर आम्हाला सर्वाधिक ओवाळणी मिळते. शेवटी मंगल कार्यालयात आल्यावर ‘झिंगाट’ गाण्यावर वधू-वराकडील सर्व वऱ्हाडी डान्स करतात...

शहरात कुठून येतात कलाकार ?शहरात आजघडीला लहान-मोठी ३० बँडपथके आहेत. त्यांच्याकडे मिळून आजघडीला ५०० पेक्षा अधिक कलाकार आहेत.

इतर शहरातून पथके येतातयात नाशिक, मनमाड, जालना, परभणी, पैठण, फुलंब्री, कन्नड, वैजापूर येथून कलाकार शहरात लग्नहंगामात मुक्कामी येतात. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था बँडपथकाचे मालक करतात. एका लग्नात १० ते २१ कलाकार बँड वाजवितात. २० हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत सुपारी घेतली जाते. याशिवाय दाट तिथीच्या दिवशी चाळीसगाव, बीड, इ. शहरांतूनही बँडपथके येतात.- सय्यद आझम, अध्यक्ष, औरंगाबाद बँड असोसिएशन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarriageलग्न