शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ झळकणार गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 18:01 IST

'ग्लोबल आडगाव' चित्रपट यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिकेत देखील झळकला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात ‘ग्लोबल आडगाव’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केली. पुणे, कोलकाता येथील नामवंत चित्रपट महोत्सवात झळकलेला हा सिनेमा आता गोव्यात आपली कमाल दाखवणार आहे.

शहरातील प्रा. अनिल साळवे लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट राज्य सरकारने फिल्म मार्केटसाठी निवडला आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये, संदीप पाटील यांच्या समितीने ३० चित्रपटांतून या चित्रपटाची निवड केली. अमेरिकेत नुकताच या चित्रपटाचे लेखक म्हणून अनिल साळवे यांचा सन्मान करण्यात आला. या सिनेमातून शेती, माती, ग्रामसंस्कृती, त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे शेतीचे झालेले नुकसान इ. विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.

'ग्लोबल आडगाव' चित्रपट यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिकेत देखील झळकला आहे. चित्रपटास देश-विदेशातील नामवंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या अजंता_एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशोक कानगुडे याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये,अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती, जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. डॉ.विनायक पवार, प्रशांत मांडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी रचलेल्या गीतांना प्रख्यात गायक आदर्श शिंदे, डॉ.गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी स्वरसाज चढविला आहे. मराठवाड्याच्या मातीत तयार झालेला चित्रपट आता गोवा आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकत असल्याने सिनेरसिकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathi Movieमराठी चित्रपट