शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

छत्रपती संभाजीनगरवासीयांची ‘कालीमुछ’ला पहिली पसंती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 17, 2023 19:50 IST

वर्षभरात जेवढा तांदूळ शहरात विकतो, त्यातील निम्मा तांदूळ ‘कालीमुछ’ असतो.

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांची ‘कालीमुछ’ला पहिली पसंती, असा मथळा वाचल्यावर तुम्ही एकदम आर्श्चयचकीत झाला असाल, पण गैरसमज नको, कालीमुछ म्हणजे पीळदार मिश्या नव्हे, तर ‘तांदळा’तील एक ‘वाण’ आहे. या तांदळाचा भात येथील खवय्यांना एवढा आवडतो की, वर्षभरात जेवढा तांदूळ शहरात विकतो, त्यातील निम्मा तांदूळ ‘कालीमुछ’ असतो.

कालीमुछ का आवडतो?छत्रपती संभाजीनगरकरांना ‘कालीमुछ’ तांदूळ का आवडतो, याचे उत्तर भात खाल्ल्यावरच मिळते. भात शिजल्यावर नरम होतो. मोकळा होतो व सुगंधीत असतो. नुसत्या सुगंधामुळे हा भात खाण्याची खूप इच्छा होते.

कोणत्या तांदळाला किती भाववाण ---------- किंमत (क्विंटल)कालीमुछ - ५,१०० रु. ते ५,५०० रु.कोलम - ५,१०० रु. ते ५,५०० रु.आंबेमोहर - ३,७०० ते ७,५०० रु.इंद्रायणी - ४,००० ते ४,६०० रु.मदर इंडिया - ४,००० ते ४,४०० रु.बासमती - ९,००० ते ११,००० रु.

कालीमुछसोबत बासमतीहीवार्षिक धान्य खरेदी करणारे कालीमुछ खरेदी करतातच, शिवाय त्यासोबत बासमती तांदूळही आवर्जून खरेदी करतात. कारण दैनंदिन भात खाण्यासाठी कालीमुछचा वापर करतात किंवा सणाच्या दिवशी किंवा मंगलकार्याच्या वेळीस बासमतीचा खास बेत केला जातो. हेच छत्रपती संभाजीनगरकरांचे वैशिष्ट्य आहे.- जगदीश भंडारी, तांदळाचे व्यापारी.

तेजीनंतर मंदीमागील वर्षी डिसेंबरमध्ये बासमती व अन्य तांदळांची जगभरात निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने, देशांतर्गत जानेवारी, २०२३ या महिन्यात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, नंतर तीन महिन्यांत ३०० रुपयांनी भाव कमी झाले.

हंगामात दररोज ५० टन विक्रीडिसेंबर ते एप्रिलच्या दरम्यान दररोज ५० टन तांदळाची विक्री होते. यात २० ते २५ टन तांदूळ ‘कालीमुछ’ असतो.- संजय कांकरीया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नMarketबाजार