शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जीवन संपविलेल्या तरुणाचा महिनाभराने मोबाइल ऑन, व्हिडिओ पाहून कुटुंबाला बसला धक्का

By सुमित डोळे | Updated: June 12, 2024 12:03 IST

तरुणाने जीवन संपविण्यापूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ महिन्याने समोर, महिलेवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : तरुणाच्या आत्महत्येच्या महिनाभरानंतर त्याचा मोबाइल सुरू केला असता त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ समोर आला. त्याने त्यात केलेल्या आरोपानंतर त्याच्या आत्महत्येस जबाबदार धरत एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंका उर्फ पूजा सोनवणे (३५, रा. आंबेडकरनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

देवीकल्याण लक्ष्मण खिरे (६४, रा. टी. व्ही. सेंटर) यांचे व लंकाचे जमिनीवरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. त्यातून लंकाने खिरे कुटुंबावर मारहाणीचा गुन्हादेखील दाखल केला होता. १३ मे रोजी सायंकाळी खिरे कुटुंब नातवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. तेव्हा देवीकल्याण यांचा अविवाहित मुलगा सुभाष (३४) हा अचानक कार्यक्रमातून घरी गेला. देवीकल्याण यांनी त्याच्यासाठी जेवणाचा डबदेखील घरी नेला. मात्र, तोपर्यंत सुभाष यांनी जिन्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दु:खात असल्याने देवीकल्याण यांचे त्याच्या मोबाइलकडे लक्ष गेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना सुभाष यांचा मोबाइल बंद अवस्थेत आढळून आला.

महिनाभराने मोबाइल ऑन, कुटुंबाला बसला धक्कादेवीकल्याण यांनी भाचा गणेशकडून मोबाइल सुरू करवून घेतला. तो तपासला असता काही व्हिडीओ आढळले. त्यापैकी सुभाष यांनी १३ मे रोजी रात्री ११:०० वाजता आत्महत्येपूर्वी तयार केलेला होता. त्यात त्यांनी लंकावर गंभीर आरोप केल्याचे निदर्शनास आले. लंकामुळेच मी आत्महत्या करत असल्याचा सुभाष यांनी व्हिडीओत उल्लेख केला. सदर मोबाइलसह कुटुंबाने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर लंकावर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक शंकर शिरसाट तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद