शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे लचके तोडणाऱ्या श्वानाचा इतर मोकाट कुत्र्यांना चावा, नागरिकांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:50 IST

जवळपास १४ जणांचे लचके तोडलेला पिसळलेला कुत्रा आढळला मृतावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : एन-७ सिडको, मुकुल मंदिर शाळा परिसर, सिडको पोलिस स्टेशन परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १४ जणांचे लचके तोडल्याची घटना रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान घडली. हा श्वान रात्री मृतावस्थेत आढळल्याची माहिती महापालिकेच्या श्वान पथकाने दिली.

मोकाट कुत्र्याने अनेकांवर हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या श्वान पथकाने रविवारी रात्री एन-७ परिसरात धाव घेतली. तेव्हा सदर मोकाट श्वान मृतावस्थेत आढळला. या श्वानाने चावा घेतलेल्या अन्य एका मोकाट कुत्र्याला पथकाने ताब्यात घेतले. मृतावस्थेत आढळलेल्या या श्वानाने परिसरातील अनेक मोकाट कुत्र्यांनाही चावा घेतला होता. त्यामुळे अन्य मोकाट कुत्रेही पिसाळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लसीकरण करणारएन-७ परिसरातील इतर मोकाट श्वानांचेही लसीकरण केले जाईल, अशी माहिती प्रभारी पशू वैद्यकीय अधिकारी शेख शाहेद यांनी दिली.

इतर मोकाट कुत्र्यांची चाचणी करावीछत्रपती संभाजीनगर येथील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांवर आळा घालण्यासाठी श्वानपथक यंत्रणा ही कमजोर सिद्ध झाली आहे. अनेक वर्षांपासून फक्त श्वान पथकावर पैसा खर्च करण्यात येतो. परंतु नागरिकांना जो कुत्र्यापासून त्रास आहे, तो अजूनही चालूच आहे. त्याचा सर्व भुर्दंड नागरिकांवर पडत आहे. एन-७ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या इतर मोकाट कुत्र्यांची वैद्यकीय चाचणी करून औषधोपचार करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे मनपाकडे केली आहे.- रवींद्र तांगडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :dogकुत्राchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर