शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

... तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते, ६ महिनेच शिल्लक : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:22 IST

मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन.

औरंगाबाद : कॅन्सरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका नव्या डॉक्टरने राहिलेली कामे करून घ्या, तुमच्याकडे ६ महिनेच शिल्लक आहेत, असे मला सांगितले होते. ही गोष्ट आहे २००४ ची. पण, कॅन्सरवर यशस्वीपणे मात करून तेव्हापासून आज २०२२ पर्यंत मी महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यात जातो. संकटाशी सामना करण्याचा आत्मविश्वास तयार करावा, त्याविरुद्ध लढावे आणि जिंकावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले. 

औरंगाबादेतील मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे सोमवारी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. वरुण नागोरी, डॉ. तुषार मुळे, डॉ. ओम मुंडे, डॉ. धनंजय घुगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  

पवार म्हणाले, २००४ च्या लोकसभा निवडणूक काळात गालावर सूज दिसली. मुंबईच्या रुग्णालयात तपासण्या झाल्या. कॅन्सरची शक्यता वर्तविली. ऑपरेशन सांगितले. कॅन्सर म्हटले की धक्का बसतो. पण, कोणालाही कॅन्सर झाला तर त्याच्याशी लढा, मात करा.

न्यू यॉर्कमधील डॉक्टर घेतात सल्लाशरद पवार म्हणाले, कॅन्सरच्या उपचारासाठी मी त्यावेळी विचारपूस केली. तेव्हा न्यू यॉर्कमधील रुग्णालयाची माहिती मिळाली. तेथील डॉक्टरांनी विचारले की, तुम्ही येथे का आलात? कारण कठीण केसेसबाबत महाराष्ट्रातीलच डॉक्टरांचा सल्ला आम्ही घेतो, असे त्या डॉक्टरांनी सांगितले. मग परत मुंबईला आलो आणि शस्त्रक्रिया केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMarathwadaमराठवाडाcancerकर्करोग