शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले

By बापू सोळुंके | Updated: April 29, 2023 11:46 IST

छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना: एकाचा बुडून मृत्यू, तर एकास वाचविण्यात यश

छत्रपती संभाजीनगर : माहेरी गेलेली पत्नी परत येत नाही यामुळे चिडलेल्या दारुड्या बापाने त्याची दोन्ही मुलांना पाण्याने भरलेल्या विहिरीत फेकून दिले. या घटनेत ७ वर्षीय बालकाचा जीव गेला तर ९ वर्षीय मुलाला वाचविण्यात नागरिकांना यश आले. ही खळबळजनक घटना चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

श्रेयस राजू भोसले (६)असे मृत मुलाचे नाव आहे. तर शिवम राजू भोसले (९)यास वाचविण्यात यश आले. राजू प्रकाश भोसले (३५) असे या निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, राजू हा चौधरी कॉलनी येथे पत्नी आणि दोन मुलांसह अनेक वर्षांपासून राहत होता. तारफेन्सिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. मात्र गेल्या काही वर्षापासून त्याला दारूचे व्यसन जडल्यापासून तो बायको आणि मुलांना मारहाण करून त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी नांदेड येथील माहेरी निघून गेली होती. जाताना तिने तिचे दोन्ही मुलेही सोबत नेले होते. वारंवार फोन करूनही पत्नी परत आली नाही.

यामुळे तो त्यांना परत आणण्यासाठी तो नांदेडला गेला होता. तेव्हा पत्नीने त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगरला परतण्यास नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात तो शिवम आणि श्रेयसला घेऊन छत्रपती संभाजीनगरला परतला. मुलांना येथे आणल्यानंतरही त्याचे व्यसन बंद झाले नव्हते. दोन महिन्यांपासून कसबसा तो मुलांना सांभाळत होता़ नेहमीप्रमाणे आजही शुक्रवारी सायंकाळीही तो नशेत तर्रर होता. रात्री अचानक ८:३० वाजेच्या सुमारास तो घरी आला़ घरापासून २०० मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला़ क्षणाचाही विचार न करता त्याने एकापाठोपाठ दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिले आणि तो माघारी परतला.

अन् क्षणार्धात अनिरुद्धने विहिरीत मारली उडीराजू भोसलेने दोन्ही मुलं विहिरीत ढकलून दिली, हा प्रकार परिसरातील अनिरुद्ध दहीहंंडे या तरुणाने बघितल्याने त्याने क्षणार्धात विहिरीत उडी मारली़ अंधार असल्याने त्याच्या हाताला ९ वर्षाचा शिवम ऊर्फ शंभू लागला़ शंभूला वाचविण्यात त्याला यश आले. यानंतर त्याने नागरिकांच्या मदतीने श्रेयसचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चिमुकला तळाशी बुडाल्याने अंधारात त्यांना सापडत नव्हता.

अग्निशमन दलाला पाचारणश्रेयस याचा मृतदेह काढण्यासाठी अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत विहिरीत शोध कार्य सुरू केले. काही मिनिटाच्या शोधकार्यानंतर श्रेयसचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात जवानांना यश आले. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रूर राजू भोसले यास ताब्यात घेतले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद