शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

गुवाहाटीची संकल्पना औरंगाबादेत, काय बाटल्या, काय माती, काय ते घर... ओक्केमधीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:17 IST

गुवाहाटीतील पामोही गावात पर्मिना-मेझीन या दाम्पत्याचे अक्षर स्कूल आहे

राम शिनगारेऔरंगाबाद : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा गुवाहाटीतील डायलॉग देशभर फेमस झाला आहे. याच गुवाहाटीच्याजवळील पामोही गावात अक्षर स्कूलने राबविलेली ‘इकोब्रिक’ची संकल्पना दौलताबाद ते शरणापूर फाटा या रस्त्यावर ‘इको फ्रेंडली हाउस’ बनविण्यासाठी वापरली आहे. यासाठी १६ हजार रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, काही टन प्लास्टिक कचरा आणि मातीचा वापर करण्यात आला. या अनोख्या ‘वावर’ प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी झाले.

गुवाहाटीतील पामोही गावात पर्मिना-मेझीन या दाम्पत्याचे अक्षर स्कूल आहे. या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क न घेता घरातील प्लास्टिक आणण्यासाठी सांगितले जाते. हे प्लास्टिक पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्याद्वारे सिमेंटमध्ये विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी जागा केल्या आहेत. याविषयीचा व्हिडिओ यूट्यूबवर शासकीय फाइन आर्ट महाविद्यालयातील एमएफएच्या विद्यार्थिनी नमिता कपाळे व कल्याणी भारंबे यांनी पाहिला. त्यानुसार आपणही औरंगाबाद परिसरात ‘इकोब्रिक’च्या माध्यमातून प्रकल्प साकारू, असे दोघींनी ठरवले. एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातील १० हजार बाटल्यांमध्ये प्लास्टिक भरले. उर्वरित ६ ते ७ हजार बाटल्यांमध्ये माती भरली. जुलै २०२१ मध्ये भिंत उभारून ट्रायल घेतली. 

सहा ते सात लाख रुपये खर्च : इको हाऊस उभारणीसाठी सहा ते सात लाख रुपये खर्च आला आहे. हे हाऊस कमीत कमी दहा वर्षे टिकेल. सिमेंटमध्ये उभारल्यास त्याचे आयुष्य वाढते. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविला असल्यामुळे त्यात सिमेंट न वापरता मातीचा वापर केला असल्याचे नमिता आणि कल्याणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन