शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रक्षकच बनला भक्षक! वृद्ध मुनोत दाम्पत्याचा निर्घृण खून; मुख्य सूत्रधाराला जन्मठेपेऐवजी फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:15 IST

पाच आरोपींना जन्मठेप, कट रचून टाकलेल्या दरोड्यात थंड डोक्याने केले खून

औरंगाबाद : बंगल्यावर दरोडा टाकून वयोवृद्ध मालक मुनोत दाम्पत्याच्या निर्घृण खून खटल्यातील मुख्य सूत्रधार शिवकुमार रामसुंदर साकेत याची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. एस. बी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (दि. ८) फाशीमध्ये रूपांतरित केली, तर उर्वरित ५ आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे. या गुन्ह्यात अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या आदेशाविरुद्धचे सर्व आरोपींचे अपील खंडपीठाने फेटाळले. आरोपींचे कृत्य ‘दुर्मीळात दुर्मीळ’ असल्यामुळे त्यांना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा ठोठावण्याची विनंती करणारे सरकार पक्षाचे अपील मंजूर करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

काय होती घटना?अहमदनगरमधील व्यापारी रमेश मुनोत (वय ६०) यांच्या बंगल्यावर दिवसाचा पहारेकरी म्हणून शिवकुमार साकेत नोकरीस होता. मुनोत यांचा मुलगा आणि सून चंद्रपूरला लग्नासाठी गेले होते. घरात रमेश मुनोत (६०) आणि त्यांच्या पत्नी चित्रा मुनोत (५२) हे दोघेच होते. शिवकुमारला मध्य प्रदेशमधील त्याच्या गावी जाण्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्याने मुनोत यांच्या बंगल्यावर काही काळ काम केलेल्या पाचजणांसोबत आदल्या दिवशी कट रचून ३ डिसेंबर २००७ च्या रात्री मुनोत यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला. आरोपींपैकी एकाने मुनोत यांना भेटण्याचा बहाणा करून रात्रीचा पहारेकरी सुमित तिवारी बेसावध असताना त्याला पकडून आरोपींनी कानपट्टीने त्याचे तोंड बांधून विजेच्या खांबाला बांधले. आरोपीपैकी एकजण त्याच्याजवळ थांबला. आरोपींनी घरात घुसून चित्रा मुनोत यांना खुर्चीला बांधून पतीसमोरच त्यांची हत्या केली, तर रमेश मुनोत यांच्या छातीत चाकूने वार करून त्यांचाही निर्घृण खून केला होता. याबाबत मुनोत यांचे पुतणे सुनील मुनोत यांनी तक्रार दिली होती. खटल्याच्या सुनावणीअंती अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने ६ आरोपींना २१ ऑक्टोबर २०१३ ला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

खंडपीठात सरकार पक्षाचा युक्तिवादसरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिभूषण प्र. देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, शिवकुमार हाच मुख्य सूत्रधार असून, त्याच्याशिवाय गुन्हा घडलाच नसता. वृद्ध दाम्पत्याचा रक्षकच (पहारेकरी) त्यांचा भक्षक बनला. त्याने मालकाचा विश्वासघात केला. शिवकुमारला पैशांची गरज होती. त्याने कट रचून थंड डोक्याने असहाय वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून केला. ही दुर्मीळातील दुर्मीळ घटना असल्याने आरोपीला फाशी देण्याची विनंती केली. 

या पाच आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम मुनोत दाम्पत्याच्या खुनाच्या आरोपाखाली अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या सहा आरोपींपैकी राजू दरोडे (रा. अहमदनगर) आणि मध्य प्रदेशातील रेवा येथील शैलेंद्रसिंग ठाकूर, राजेशसिंग ठाकूर, संदीप पटेल आणि वेरुंद्रसिंग ठाकूर या पाच आरोपींची जन्मठेपेची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम केली.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू